आयपीएलच्या लोकप्रियतेमुळे जगभरात टी२० क्रिकेटला अनुसरून वेगवेगळ्या लीगला सुरुवात करण्यात आली. काही लोकप्रिय झाल्या पण काहींना आपला गाशा गुंडाळावा लागला. आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून ‘द हंड्रेड लीग’ नावाच्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. २०२० मध्येच या लीगची घोषणा झाली होती, पण कोरोनाच्या साथीमुळे ती स्पर्धा पुढे ढकलल्याची सांगण्यात आले. यावेळी हि स्पर्धा १००-१०० बॉलची होणार असून लवकरच या स्पर्धेचा थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेतील समालोचकांची यादी प्रसिद्ध झाली असून त्यात एका भारतीय खेळाडूचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
समालोचकांच्या यादीत कोणत्या खेळाडूला निवडले हे ऐकायला तुम्ही उत्सुक झाले असाल, तर त्या खेळाडूचे नाव आहे दिनेश कार्तिक. या लीगचे प्रक्षेपण स्काय स्पोर्ट्स वाहिनीवर केले जाणार आहे. दिनेश कार्तिक यावेळी समालोचन करताना दिसून येणार आहे. दिग्गज खेळाडूंच्या यादीत समालोचक म्हणून दिनेश कार्तिकचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. दिनेश कार्तिकने याआधी पण भारत-इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या सामन्यांवेळी समालोचन केले होते.
स्काय स्पोर्ट्स क्रिकेटने स्टुअर्ट ब्रॉड, टॅमी ब्यूमउंट, डॅरेन सॅमी, गेनाब अब्बास, अँड्र्यू फ्लिंटॉप, कॅस नायडू, दिनेश कार्तिक, जॅक शेप्स आणि केविन पीटरसन यांना द हंड्रेड लीगमध्ये समालोचनासाठी आमंत्रित केले आहे. या स्पर्धेत समालोचन करण्यासाठी दिनेश कार्तिकला इंग्लंडला जावे लागणार आहे. या स्पर्ध्येत कोणी भारतीय खेळाडू सहभागी होणार आहे की नाही? हे अद्याप पर्यंत कळू शकलेले नाही.
THE HUNDRED ON SKY SPORTS 💯@StuartBroad8@Tammy_Beaumont@darensammy88@ZAbbasOfficial@flintoff11@KassNaidoo@DineshKarthik@JaxxSheps@KP24
Meet the @SkyCricket team for #TheHundred, which all begins in 💯 days' time!
— Sky Sports Cricket (@SkyCricket) April 12, 2021
भारतीय क्रिकेट बोर्डाचा भारतीय क्रिकेटपटूंना आयपीएल सोडून इतर फ्रॅन्चायझी क्रिकेटमध्ये खेळायला नकार आहे. परंतु निवृत्त खेळाडूंना यात सहभागी होता येणार आहे. मात्र कोणते खेळाडू या स्पर्ध्येत सामील होतात ते अजून स्पष्ट नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“तीन वर्ष वाट पाहावी लागली, अखेर स्वप्न पूर्ण झालं,” धोनीला बोल्ड करणाऱ्या आवेश खानची प्रतिक्रिया
कर्णधार म्हणून मैदानात उतरताच संजू सॅमसनचा मोठा पराक्रम, खास क्लबमध्ये झाला सामील