दिनेश कार्तिकच्या संपुर्ण कारकिर्दित ज्या खेळीची सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे निदाहास ट्राॅफीच्या अंतिम सामन्यातील ८ चेंडूत २९ धावांच्या खेळीची.
कोलंबो येथे १८ मार्चला झालेल्या सामन्यात बांग्लादेशविरुद्ध त्याने ही खेळी केली होती. या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माने केले होते.
शेवटच्या सामन्यात जेव्हा दिनेश कार्तिकला ५व्या क्रमांकावर खेळायला न पाठवता विजय शंकर या खेळाडूला खेळायला पाठवले तेव्हा दिनेश कार्तिक हा रोहितवर चिडला होता.
याचा खुलासा एका मुलाखतीमध्ये खुद्द रोहित शर्माने केला आहे. ” दिनेश कार्तिकला ज्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले त्यामुळे तो खुश नव्हता. त्याने या स्पर्धेत आणि त्यापुर्वी चांगली कामगिरी केली होती. परंतु त्या मोठ्या खेळी केल्या नव्हत्या. मी निदाहास ट्राॅफी फायनलमध्ये विचार केला की विजय शंकरला खेळायला पाठवु आणि एक अनुभवी खेळाडू पाठीमागे ठेऊ. परंतु यामुळे कार्तिक मात्र चांगलाच भडकला. त्याला अपेक्षा होती की फलंदाजीला त्याला वरच्या क्रमांकावर संधी मिळेल. ” असे रोहित म्हणाला.
“जेव्हा मी बाद होऊन डगआऊटमध्ये आलो तर दिनेश कार्तिक माझ्याकडे खुप रागाने पहात होता. मी त्याला म्हणालो ठीक आहे. तु जा आणि गेम संपव तर कार्तिक मला फक्त म्हणाला ठीक आहे. तेव्हा तो खुप रागात होता. मी त्याला बरेच समजावले परंतु तो मला निट प्रतिसादच देत नव्हता. त्यामुळे मी तिथुन निघुन गेलो.” असेही रोहित पुढे म्हणाला.
शेवटी हा ऐतिहासिक सामना संपल्यावर कार्तिक मैदानात काहीही बोलला नाही. परंतु हाॅटेलमध्ये गेल्यावर त्याने रोहितला धन्यवाद दिले. हीच माझ्यासाठी योग्य जागा होती असे कार्तिक त्याला बोलल्याची आठवण रोहितने सांगितली.