शुक्रवारी (10 जानेवारी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA), पुणे येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात तिसरा आणि अंतिम आंतरराष्ट्रीय टी20 सामना (3rd T20 Match) पार पडला. हा सामना भारताने 78 धावांनी जिंकला. तसेच मालिकाही 2-0 ने खिशात घातली.
या सामन्यात शिखर धवन आणि केएल राहुल यांनी शानदार अर्धशतकी खेळी केल्या. या मालिकेत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे या मालिकेत सलामीला फलंदाजी करण्यासाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि केएल राहुलला (KL Rahul) संधी मिळाली.
शिखरने या मालिकेतून दुखापतीनंतर भारतीय संघात दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे आता भारतीय संघव्यवस्थानेसमोर रोहित पुन्हा संघात आल्यानंतर कोणाला सलामीला संधी द्यायची ही समस्या असेल.
तसेच मागील अनेक दिवसापासून याविषयी क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीने ‘मी कोणत्याही खेळाडूंची एकमेकांशी तुलना करण्यावर विश्वास ठेवत नाही’, असे श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यानंतर खडसावले आहे.
पुण्यातील श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) सांगितले की हे तिन्ही (रोहित, राहुल आणि धवन) खेळाडू उत्कृष्ट आहेत.
“रोहित नियमितपणे भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करत आहे,” असे विराट यावेळी म्हणाला.
त्याचबरोबर विराट म्हणाला की, चाहत्यांनी खेळाडूंची तुलना करणे बंद केले पाहिजे. एवढे खेळाडू संघाला विजय मिळवून देण्यासाठी चांगली कामगिरी करत आहेत, त्यासाठी सर्वांनी आनंदित झाले पाहिजे.
असा पराक्रम करणारा किंग कोहली एकटाच!
वाचा👉https://t.co/POmYYQa2Hz👈#म #मराठी #Cricket #Pune #TeamIndia #INDvSL @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020
किंग कोहलीचे नाव आता या ६ दिग्गज कर्णधारांच्या यादीत सन्मानाने घेतले जाणार!
वाचा👉https://t.co/sIjbzetQ6R👈#म #मराठी #Cricket #Pune #TeamIndia #INDvSL @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020