भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ हे दोघेही सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. म्हणून त्यांच्यात तुलना होणे साहजिक आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने त्यांची तुलना करत म्हटले आहे की, “विराट आणि स्मिथ दोघेही आपापल्या संघाचे मानसिक बळ वाढवण्यात सारखे आहेत. पण, दोघांचा फलंदाजी करण्याचा जोश आणि शैली हे दोन्हीही वेगवेगळे आहेत.” Drive to succeed is different for virat kohli and steve smith says david warner.
वॉर्नरने प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्याशी क्रिकबझ इन कनवरसेशनमध्ये सांगितले की, “विराटचा धावा घेण्याचा जोश आणि शैली हे स्मिथपेक्षा वेगळे आहेत. विराट विरुद्ध संघाला कमजोर करण्यासाठी धावा घेत असतो. तर, स्मिथ त्याच्या फलंदाजीची मजा लुटत असतो.”
“स्मिथ खेळपट्टीवर चेंडूला हिट करण्याच्या दृष्टीने फलंदाजी करत असतो. त्याला खेळपट्टीवर टिकून राहुन फटकेबाजी करायला आवडते. त्याला लवकर बाद व्हायला आवडत नाही. त्याच्या फलंदाजीचा आनंद लुटायचा असतो. ‘
तसेच विराटला या गोष्टीचा अंदाज आहे की, तो खेळपट्टीवर टिकून राहिला तरच त्याचा संघ पुढे जाईल, असे वॉर्नर म्हणाला.
“विराटला निश्चितच लवकर बाद व्हायचे नसते. पण त्याला माहित आहे की तो सुरुवातीला जास्त वेळ घेत खेळपट्टीवर टिकून राहिला तर नंतर जलदगतीने धावा घेऊ शकतो. तो विरुद्ध संघावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. यामुळे पुढे फलंदाजीस येणाऱ्या क्रिकेटपटूंना मदत होते. भारतीय संघात अनेक असे खेळाडू आहेत, जे उत्कृष्ट कामगिरी करू शकतात,” असेही तो म्हणाला.
याबरोबरच वॉर्नर म्हणाला की, “विराट आणि स्मिथ हे दोघेही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत. जर त्यांनी चांगली खेळी केली तर आपोआप त्यांच्या संघाचे मनोबळ वाढते. पण जर ते लवकर बाद झाले. तर, सर्वांवर तणाव येतो की आता आपल्याला सगळ्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. ती खूप विचित्र स्थिती असते,” असेही वॉर्नर भोगलेंशी बोलताना म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
हा विश्वविजेता कर्णधार म्हणतो, ऑलिम्पिकच्या दृष्टीने हा क्रिकेटप्रकार…
जखमी अवस्थेत असतानाही संघहितासाठी मैदानात उतरलेले ५ क्रिकेटपटू
…तर मैदानावर सेलिब्रेशन करताना खेळाडू हात मिळविण्याऐवजी करतील…