वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो याने इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) निवृत्ती जाहीर केली आहे. ब्रावोने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शुक्रवारी (2 डिसेंबर)ही माहिती दिली. तसेच चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होची आयपीएल 2023च्या आधी संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शुक्रवारी (2 डिसेंबर) याची माहिती दिली. ब्राव्हो 2008 मध्ये सुरुवातीपासूनच या स्पर्धेत खेळत आहे. लक्ष्मीपती बालाजी वैयक्तिक कारणामुळे एका वर्षाचा ब्रेक घेत असल्याने ब्रावोवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने निवृत्ती घेण्याचे आणि त्याचा आयपीएलमधील प्रवासाबाबत सांगितले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “15 वर्षांच्या सर्वात कठीण टी20 लीगमध्ये खेळल्यानंतर, मी आज जाहीर करतो की मी यापुढे आयपीएलमध्ये भाग घेणार नाही. अनेक चढ-उतारांसह हा एक उत्तम प्रवास ठरला. त्याचवेळी मी गेल्या 15 वर्षांपासून आयपीएलचा भाग असल्याबद्दल कृतज्ञ आहे. मला माहित आहे की हा दिवस माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांसाठी दुःखाचा दिवस आहे. पण त्याच वेळी, गेल्या 15 वर्षांतील माझी कारकीर्द आपण सर्वांनी साजरी करावी अशी माझी इच्छा आहे.”
Official Statement 🔗🔽 @DJBravo47
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 2, 2022
चेन्नईने देखील निवेदन जाहिर केले असून त्यामध्ये ब्रावोने म्हटले, “मी या नवीन प्रवासाची वाट पाहत आहे कारण माझे खेळाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: नवीन असे काही करताना पाहत आहे. मला गोलंदाजांसोबत काम करणे आवडते आणि ज्याबद्दल मी उत्सुक आहे. मला खूप जुळवून घ्यावे लागेल कारण मी खेळत असताना, मी नेहमी गोलंदाजांसोबत काम करतो आणि फलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढे कसे असावे यासाठी योजना आणि कल्पना मांडण्याचा प्रयत्न करतो. फरक एवढाच आहे की मी यापुढे मध्यभागी उभा राहणार नाही.”
ब्रावोने पहिले तीन हंगाम मुंबई इंडियन्सकडून खेळले. त्याने पहिला आयपीएल सामना चेन्नईविरुद्धच खेळला होता. नंतर 2011मध्ये तो चेन्नईसोबत खेळला. त्याची उत्तम कामगिरी पासून चेन्नईने 2014च्या हंगामासाठी त्याला रिटेन केले. 2016 मध्ये गुजरात लायन्सकडून खेळल्यानंतर तो 2018 मध्ये पुन्हा एकदा चेन्नईमध्ये आला.
https://www.instagram.com/reel/ClqLozEpQUd/?utm_source=ig_web_copy_link
ब्रावोची आयपीएलमधील कामगिरी-
ब्रावो हा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 161 सामन्यांत 183 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने जवळपास 130च्या स्ट्राईक रेटने 1560 धावा केल्या आहेत. तो 2011 पासून चेन्नईचा महत्वाचा भाग आहे. जेव्हा संघाने 2011, 2018 आणि 2021मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले, तेव्हा तो संघाचा भाग होता. तसेच चेन्नईने 2014मध्ये चॅम्पियन्स लीग जिंकली तेव्हाही तो संघात होता.
ब्रावोची आयपीएलमधील चेन्नईसाठीची कामगिरी-
आयपीएलमध्ये दोनदा पर्पल कॅप जिंकण्याचा विक्रम ब्रावोच्या नावावर आहे. त्याने 2013 आणि 2015च्या हंगामात अशी कामगिरी केली. ब्रावोने चेन्नईकडून 144 सामने खेळताना 168 विकेट्स घेत 1556 धावा केल्या आहेत. Dwayne Bravo announces retirement from IPL, stays with Super Kings as bowling coach
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लई चोपलं राव! पाकिस्तानी खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, संघाचीही मान शरमेने खाली
‘विश्वविक्रमी’ रावळपिंडी टेस्ट! पाकिस्तानवर बझबॉल भारी, इंग्लंडच्या फलंदाजांनी गाजवला पहिला दिवस