वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने मागीलवर्षी डिसेंबरमध्ये निवृत्तीतून माघार घेतली होती. त्यानंतर आता त्याचा 15 जानेवारीपासून आयर्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या टी20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
तो याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे सप्टेंबर 2016मध्ये पाकिस्तान विरुद्ध टी20 सामन्यात खेळला आहे.
त्याच्या निवडीबद्दल वेस्ट इंडिजचे निवडकर्ते रॉजर हार्पर म्हणाले, ‘ड्वेन ब्राव्होला आमच्या डेथ बॉलिंगसाठी उत्तेजन देण्याच्या विशिष्ट हेतूने परत बोलावण्यात आले आहे. ज्यामध्ये आम्हाला सुधारणा करायच्या आहेत. डेथ बॉलिंगमध्ये ब्रावोची आकडेवारी चांगली आहे. त्यामुळे तो मार्गदर्शक म्हणूनही काम करु शकतो आणि त्याचा अनुभवही अन्य गोलंदाजांशी शेअर करु शकतो.’
36 वर्षीय ब्रावोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 270 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 66 टी20 सामने आहेत. टी20मध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी करताना 1141 धावा केल्या आहेत आणि 52 विकेट्स घेतल्या आहेत.
ब्रावो व्यतिरिक्त आयर्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात रोव्हमन पॉवेलचेही पुनरागमन झाले आहे.
तसेच फॅबियन ऍलेन आणि किमो पॉल यांना दुखापतीमुळे वेस्ट इंडिज संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर जेसन होल्डरला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचाही संघात समावेश नाही.
आयर्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडिजचा संघ –
किरॉन पोलार्ड (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमेयर, ब्रँडन किंग, एव्हिन लुईस, खॅरी पिएर, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, शेर्फेन रुदरफोर्ड, लेंडल सिमन्स, हेडन वॉल्श, केसरीक विल्यम्स.
केकेआरला मोठा धक्का, हा खेळाडू आयपीएल २०२० खेळण्यासाठी अपात्र
वाचा👉https://t.co/W7Z8HOIfWr👈#म #मराठी #Cricket #IPL2020 #KKR— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
मुंबई वनडेत केएल राहुल की शिखर धवन, कोण करणार संघात स्थान कायम?
वाचा👉https://t.co/ityR1urWWw👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @klrahul11 @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020