---Advertisement---

कझाकिस्तानच्या रिबाकिनाने रचला इतिहास; पहिल्याच प्रयत्नात पटकावले विम्बल्डनचे जेतेपद

Elena-Rybakina
---Advertisement---

विम्बल्डनमध्ये महिला एकेरीची अंतिम फेरी पार पडली आहे. यंदाच्या महिला एकेरीला नवा चॅम्पियन मिळाला आहे. शनिवारी (९ जुलै) झालेल्या या सामन्यात कझाकिस्तानच्या एलेना रिबाकिना (Elena Rybakina) हिने ट्यूनिशियाच्या ओन्स जब्योर (Ons Jabeur) हिला ३-६, ६-२, ६-२ असे पराभूत केले आहे. या दोघीही पहिलाच विम्बल्डन खेळत होत्या. जब्योर ही विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली ट्यूनिशियाई, पहिली अरब आणि पहिली आफ्रिकी महिला ठरली आहे. तसेच रिबाकिना ही विम्बल्डन जिंकणारी पहिलीच कझाकिस्तानची खेळाडू ठरली आहे.

अंतिम फेरीत पहिल्यांदाच खेळताना रिबाकिना आणि जब्योर दोघींवर फारच दबाव होता. पहिला सेट गमावल्यावर रिबाकिनाने धमाकेदार पुनरागमन करत सलग दोन सेट जिंकत विम्बल्डनचा किताब पटकावला आहे. हा सामना १ तास ४८ मिनिटे रंगला. याबरोबरच ती ओपन इरामध्ये २१ वर्षीय पेट्रा क्वितोवा (२०११) नंतर जिंकणारी युवा खेळाडू ठरली आहे.

रेबेकिना मागील वर्षी झालेल्या फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली होती. त्याआधी झालेल्या चौथ्या फेरीत तिने सेरेना विलियम्स (Serena Williams) हीला पराभूत केले होते.

विम्बल्डन जिंकल्यावर त्याचे सेलेब्रेशन कसे करायचे हे रेबेकिनाला माहित नव्हते.

रिबाकिनाची ही पहिली ग्रॅंड स्लॅम अंतिम फेरी होती. यामध्ये जिंकताच तिचे हे कारकिर्दीतील तिसरे विजेतेपद ठरले आहे. याअगोदर तिने २०१९मध्ये बुकारेस्ट ओपन आणि २०२०मध्ये होबार्ट ओपन जिंकले आहेत. होबार्टनंतर ते विम्बल्डनपर्यतच्या या काळात तिला चार वेळा अंतिम फेरीत पराभवाचा सामना केला आहे. त्याचबरोबर ती टोकियो ऑलम्पिकमध्ये कांस्य पदकाच्या सामन्यातही पराभूत झाली होती.

रिबाकिना ही सर्वात कमी मानांकन असून चॅम्पियन ठरणारी २००७नंतरची पहिलीच खेळाडू ठरली आहे. तिला या स्पर्धेत १७वे मांनाकन होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

विराटच्या खराब फॉर्मवर उठलेल्या प्रश्नांवर जडेजाची रोखठोक उत्तरे, म्हणाला…

चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले ‘लिटल मास्टर’ गावसकरांचे केस, वाचा तो किस्सा

नातेवाईकांच्या समजदारीमुळे वाचले सुनिल गावसकर, नाहीतर बनले असते थेट मच्छिमार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---