टी20 विश्वचषक 2022 सुरू होण्यासाठी आता फार काही दिवस उरले नाहीयेत. या स्पर्धेपूर्वी अनेक संघ टी20 मालिका खेळण्यावर भर देत आहेत. यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांचाही समावेश आहे. बलाढ्य इंग्लंड क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड संघ तुफान फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिका खेळली जात आहे. यातील 9 ऑक्टोबर रोजी खेळला गेलेला पहिला सामना इंग्लंडने 8 धावांनी आपल्या नावावर केला होता, ज्यात कर्णधार जोस बटलर याने 32 चेंडूत 68 धावांची केळी केली. यामध्ये त्याने एक असा षटकार मारला, जो सध्या चर्चेत आहे.
जोस बटलर (Jos Buttler) याने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्ड्सन (Kane Richardson) याच्या गोलंदाजीवर ज्याप्रकारे स्विच शॉट खेळला होता, तो पाहून प्रत्येकाचे तोंड कदाचित उघडेच्या उघडे राहील. खरं तर, इंग्लंडच्या डावाचे ते पाचवे षटक होते. रिचर्ड्सनने त्या षटकातील पाचवा चेंडू फेकण्यासाठी धाव घेतली, तेव्हा बटलर वेळेआधीच तो शॉट खेळण्यासाठी स्वत:ला त्या पोझिशनमध्ये घेऊन आला.
हे पाहताच रिचर्ड्सन याने चेंडूची लांबी जरा छोटी केली, जेणेकरून मोठा शॉट मारता येणार नाही. मात्र, बटलरने त्याला कोणतीच संधी दिली नाही. बटलरने सहजरीत्या हा कठीण शॉट खेळला आणि आपल्यासोबतच इंग्लंडच्याही खात्यात सहा धावांची भर घातली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Buttler! 🤯#AUSvENG pic.twitter.com/rNm7rUIxdh
— cricket.com.au (@cricketcomau) October 9, 2022
उभय संघातील दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडचा विजय
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia And England) संघातील दुसरा टी20 सामना बुधवारी (दि. 12 ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यातही इंग्लंडने 8 धावांनी विजय मिळवला. इंग्लडने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्स गमावत 178 धावा चोपल्या होत्या. यामध्ये बटलरने 13 चेंडूत 17 धावांचे योगदान दिले. डेविड मलान याने 49 चेंडूत 82 धावा चोपत सामनावीर पुरस्कार पटकावला. तसेच, मोईन अली याने 27 चेंडूत 44 धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाला निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 170 धावाच करता आल्या.
अशाप्रकारे हा सामनाही इंग्लंडनेच जिंकला. विशेष म्हणजे, पहिला टी20 सामनाही इंग्लंडने 8 धावांनी जिंकला होता. आता या मालिकेत इंग्लंड 2-0 ने आघाडीवर आहे. उभय संघातील तिसरा आणि शेवटचा टी20 सामना 14 ऑक्टोबर रोजी कॅनबेरा स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चालू सामन्यात ज्युनिअरच्या अंगावर धावून गेला अंबाती रायुडू, पंचांनाही खटकलं कृत्य
‘ते दोघं वनडेत पंतची जागा घेऊ शकत नाहीत’, भारतीय दिग्गजाने कुणाबद्दल केले मोठे वक्तव्य?