काही दिवसांपुर्वीच इंग्लंडचा भारत दौरा संपला. फेब्रुवारीत कसोटी मालिकेने या दौऱ्याचा शुभारंभ झाला होता. तर मार्च अखेरीस वनडे मालिकेने हा दौरा संपन्न झाला. यजमान भारताने कसोटी, टी२० आणि वनडे मालिका जिंकत पाहुण्या इंग्लंडला क्लिन स्विप केले. यादरम्यान बऱ्याचदा उभय संघातील खेळाडूंमध्ये छोटे-मोठे वाद झाल्याच्या घटना घडल्या. आता इंग्लंडचा फलंदाज ऑली पोप याने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीवर आरोप करत त्याने आपल्याला भिती दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोपने सांगितले आहे.
चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात हा प्रकार घडला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५७८ धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाज ३३७ धावांवर गारद झाले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात मात्र इंग्लंडचा खेळ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला होता. त्यांचा पूर्ण संघ अवघ्या १७८ धावांवर सर्वबाद झाला होता.
परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर त्यांनी भारताला विजयासाठी ४१९ धावांचे आव्हान दिले होते. परंतु भारतीय संघ दुसऱ्या डावात १९२ धावा करु शकल्याने इंग्लंडने तब्बल २२७ धावांनी तो सामना खिशात घातला होता.
दरम्यान विराटने भर सामन्यात पोपला धमकी दिली होती. यासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, “सामन्यातील तिसऱ्या डावात जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजी करत होता. तेव्हा मी नॉन स्ट्राईकर बाजूवर उभा असताना विराट माझ्या जवळ आला. तो मला म्हणाला की, ही तुमची शेवटी वेळ आहे. अर्थात सपाट खेळपट्टीवर खेळण्याची तुमची शेवटची वेळ आहे. त्यानंतर मला कळाले की, उर्वरित मालिकेत फलंदाजांची अतिशय दयनीय व्यवस्था होणार आहे. याचा परिणाम सर्वांना पुढे दिसलाही. आम्ही पुढील कसोटी सामन्यात २०५ पेक्षा जास्त धावा करु शकलो नाहीत.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोहलीने प्रार्थना करावी की मुंबईकर फॉर्ममध्ये नसावेत,’ अवघे १८ सामने खेळणाऱ्या दिग्गजाचे मोठे भाष्य
कोण घेणार आयपीएलमधून माघार घेतलेल्या हेजलवुडची जागा? सीएसकेच्या अधिकाऱ्याने दिले उत्तर
लोकलने प्रवास करणारा शार्दुल आता फिरवणार महागडी कार, आनंद महिंद्रांचे भारदस्त गिफ्ट मिळालं