सोशल मीडियावर सेलेब्रेटींना त्यांचे फॅन चांगल्या कमेंट देताना, कधी कधी गलिच्छ शब्दात पण बोलत असतात. आता ट्रोल होण्यापासून वाचण्यासाठी इंग्लंड संघाने चक्क सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड संघ सोशल मीडियाला बॉयकॉट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने याबद्दल सांगितले आहे.
इंग्लंड संघाचे जोफ्रा आर्चर आणि मोईन आली सोशल मीडियावर गैरवर्तनाचे शिकार ठरले. यावेळी बोलताना ब्रॉड म्हणाला की, “सोशल मीडियावरील ट्रोलच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. आम्हाला संघ म्हणून एकत्र येण्यासाठी काही काळ सोशल मीडियापासून लांब जावे लागत असेल तर आम्ही त्यासाठी पण तयार आहोत.”
“जर संघ सहकार्यांना वाटत असेल की संघात बदल करणे गरजेचे आहे. तर आमच्यापेक्षा मोठी खूप अशी माणसे आहेत जे या प्रकारचे निर्णय सुस्पष्ट घेऊ शकतात. ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असणारे लोक पण यात मदत करतील. जर इंग्लंड टीमने असा निर्णय घेतला तर हा सर्वांसाठी खूप मोठा संदेश होईल,” असे ब्रॉड पुढे म्हणाला.
बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी काही दिवसांपूर्वीच मोईन अली बाबत एक वादग्रस्त विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, ‘जर मोईन अली क्रिकेट खेळत नसता तर तो आता दहशतवादी संघटनेत काम करत असता.’ पुढे टिका झाल्याने त्यांनी ते ट्विट डिलिट केले होते.
तस्लिमा नसरीन यांना यावेळी जॉफ्रा आर्चरने प्रत्युत्तर पण दिले होते. त्यावेळी तो म्हटला होता की, ‘आपण व्यवस्थित आहात ना? मला तर वाटत नाही आपण व्यवस्थित आहात म्हणून.’ त्यावर परत लेखिकेने त्याला म्हटले होते की, ‘मोईनबद्दल माझे ट्विट उपहासात्मक होते हे द्वेषकर्त्यांना चांगलेच माहित आहे, परंतु मुस्लिम लोकांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न केल्यामुळे लोकांनी माझा अपमान करण्याचा प्रयत्न केला.’
महत्त्वाच्या बातम्या-
अरे व्वा! ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू इंग्लंडच्या ‘द हंड्रेड लीग’मध्ये करणार समालोचन
कर्णधार म्हणून मैदानात उतरताच संजू सॅमसनचा मोठा पराक्रम, खास क्लबमध्ये झाला सामील