आयसीसी टी20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद (Adil Rashid) यानं सध्याच्या क्रिकेटमधील टॉप 5 फलंदाजांची निवड केली आहे. राशिदनं विराट कोहली, जो रूट, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि बाबर आझम यांचा आपल्या टॉप 5 फलंदाजांमध्ये समावेश केला आहे.
इंग्लंडच्या या दिग्गज फिरकीपटूनं आयसीसी क्रमवारीच्या आधारावर या 5 फलंदाजांची निवड केली आहे. राशिदनं भारताचा महान फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) पहिल्या क्रमांकावर स्थान दिलं आहे. त्याचबरोबर आदिल रशीदच्या पसंतीनुसार इंग्लंडचा जो रूट (Joe Root) दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय राशिदनं स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) तिसऱ्या क्रमांकावर स्थान दिलं आहे. चौथ्या क्रमांकावर रशीदची निवड न्यूझीलंडचा केन विल्यमसन (Kane Williamson) आहे, तर पाचव्या क्रमांकावर रशीदनं आश्चर्यकारकपणे पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमला (Babar Azam) स्थान दिलं आहे.
Adil Rashid has a great ball knowledge. 🔥pic.twitter.com/PvStJYxkz3
— Mayank Pandey (@MayankTweets18) August 8, 2024
रशीदनं फलंदाजांव्यतिरिक्त वेगवान गोलंदाजांचीही निवड केली आहे. आदिल रशीदन (Adil Rashid) जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) पहिल्या क्रमांकावर आणि इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं आहे. ट्रेंट बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर राशिदनं चौथ्या क्रमांकावर मिचेल स्टार्कला स्थान दिलं आहे. इंग्लंडच्या फिरकीपटूने शाहीन आफ्रिदीला शेवटच्या क्रमांकावर स्थान दिलं आहे.
आदिल रशीदच्या (Adil Rashid) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडच्या या फिरकीपटूनं आतापर्यंत 19 कसोटीत 60 विकेट्स आणि 135 एकदिवसीय सामन्यांमध्ये 199 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं आतापर्यंत 114 सामन्यांमध्ये 120 विकेट घेतल्या आहेत. रशीद सध्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
3 संघ ज्यांना आयपीएल 2025 पूर्वी आपले मुख्य प्रशिक्षक बदलण्याची आवश्यकता
“मला ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे आहे” दिग्गज फिरकीपटूनं व्यक्त केली इच्छा
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल, पदकांचा रंग एका आठवड्यात उडाला!