India vs England Lord’s Test: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. सध्या ही मालिका रोमांचक टप्प्यावर आहे. 2 सामन्यांनंतर ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांकडून भरपूर धावा होत आहेत. भारतीय कर्णधार शुबमन गिल, रिषभ पंत. आणि केएल राहुल यांच्यासह इंग्लंडचा हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ देखील दमदार फलंदाजी करत आहेत. या मालिकेत दोन्ही संघांकडून अनेक खेळाडूंनी शतके झळकावली आहेत. दरम्यान, आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत दीर्घकाळापासून नंबर वनवर असलेला इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटला एका धडाकेबाज खेळाडूने एजबॅस्टन कसोटीत उत्कृष्ट फलंदाजीसह भरपूर धावा करून मागे टाकले आहे. (ICC Test Batting Number 1)
इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत नंबर वनवर पोहोचला आहे. त्याने आपलाच साथीदार जो रूटला मागे टाकले आहे. हॅरी ब्रूक जिथे पहिल्या कसोटीत 99 धावांवर बाद होऊन शतक हुकले होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत ब्रूकने शानदार शतक झळकावत 158 धावांची खेळी आली. ब्रूकच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच तो आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर वन फलंदाज बनला आहे. (Harry Brook ICC Test Ranking)
हॅरी ब्रूक 2022 पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. या खेळाडूने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या 3 वर्षांतच हे स्थान मिळवले आहे. ब्रूकने आतापर्यंतच्या कारकिर्दीत 27 कसोटी सामने खेळले असून, 45 डावांमध्ये या युवा खेळाडूने 2,619 धावा केल्या आहेत. ब्रूक कसोटीत 59.5 च्या सरासरीने धावा करत आहे. या खेळाडूने आपल्या 3 वर्षांच्या कारकिर्दीत 317 धावांची सर्वोच्च धावसंख्या बनवली आहे. आता येणाऱ्या कसोटी सामन्यात ब्रूक कशी कामगिरी करतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. (Test cricket records Harry Brook)