---Advertisement---

इंग्लंडच्या बेन डकेटने रचला नवा इतिहास, भारतीय दिग्गजांना सोडले मागे!

---Advertisement---

इंग्लंडच्या बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची धमाकेदार सुरुवात केलेली आहे. इंग्लंडचा फलंदाजाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 165 धावांचा डाव खेळून इतिहास रचला आहे. बेन डकेटने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे सोडत चॅम्पियन्स ट्रॉफीचा 21 वर्ष जुना रेकॉर्ड मोडीत काढला आहे.

इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने 143 चेंडूत 165 धावा केल्या. या डावात त्याने 3 षटकार आणि 17 चौकार मारले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी खेळी ठरली आहे. त्याने 21 वर्षे जुना विक्रम देखील मोडीत काढला आहे.

बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नॅथन एस्टलच्या नावावर होता. त्याने 2004 मध्ये अमेरिकेविरुद्ध 145 धावांची खेळी केली होती. या यादीत सौरव गांगुली चौथ्या आणि सचिन तेंडुलकर पाचव्या स्थानावर आहे.

सौरव गांगुलीने 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 141 धावा केल्या आणि सचिनने 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 141 धावा केल्या.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 351 धावांचा मोठा स्कोअर केला. बेन डकेट आणि जो रूट यांनी 68 धावांची चांगली खेळी केली.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसह ग्रुप बी मध्ये आहेत. दक्षिण आफ्रिका एका विजयासह अव्वल स्थानी आहे. यावेळी ऑस्ट्रेलिया अनेक मोठ्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत आहे. स्पर्धेपूर्वी पॅट कमिन्स, हेझलवूड दुखापतीमुळे बाहेर पडले होते तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपले नाव मागे घेतले होते.

महत्वाच्या बातम्या :  

चॅम्पियन्स ट्रॉफीतील महासंग्राम: भारत-पाकिस्तान सामना कोण मारेल बाजी?

पाकिस्तानी मैदानावर भारतीय राष्ट्रगान! PCB वर सोशल मीडियावरती तुफान टीका

‘या’ 3 कारणांमुळे पाकिस्तानविरुद्ध वरुण चक्रवर्तीला भारतीय संघात स्थान मिळणार?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---