सध्या इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसरा कसोटी सामना बेसिन रिजर्व येथील रंगला आहे. दरम्यान इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटचा (Joe Root) उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रूटने धमाकेदार शतक झळकावले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 36 वे शतक आहे. या शतकासह त्याने राहुल द्रविडची (Rahul Dravid) (36 शतके) बरोबरी केली आहे.
जो रूटने न्यूझीलंडविरूद्ध 106 धावांची खेळी खेळली. 130 चेंडूंच्या खेळीत रूटने 11 चौकार मारले. या शतकासह तो फॅब-4 (जो रूट, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन, विराट कोहली) मध्ये खूप पुढे गेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट पाचव्या स्थानी पोहोचला आहे. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) यांच्या नावे प्रत्येकी 32 शतके आहेत, तर विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी कारकिर्दीत 30 शतके झळकावली आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज-
1) सचिन तेंडुलकर- 51
2) जॅक कॅलिस – 45
3) रिकी पाँटिंग- 41
4) कुमार संगकारा- 38
5) जो रूट- 36
6) राहुल द्रविड- 36
इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघातील सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर खेळाच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 6 विकेट्सवर 427 धावा करून दुसरा डाव घोषित केला. जो रूट (106 धावा), बेन डकेट (92 धावा), जेकब बेथल (96 धावा), हॅरी ब्रूक (55 धावा) यांनीही अर्धशतके झळकावली. कर्णधार बेन स्टोक्स 49 धावा करून नाबाद राहिला. पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 583 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.
Joe Root… That is RIDICULOUS! 🤯
He reaches three figures in style, ramping his way to a THIRTY-SIXTH Test century! pic.twitter.com/EFNXzRlatp
— England Cricket (@englandcricket) December 7, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; मोहम्मद सिराजच्या वागण्यावर संतापला दिग्गज! हेडसोबतच्या वादावर केले मोठे वक्तव्य
चेतेश्वर पुजारानं सांगितलं भारतीय फलंदाजांच्या फ्लॉप कामगिरीमागचं कारण, म्हणाला…
बाप तसा लेक! वीरेंद्र सेहवागच्या धाकट्या मुलाचा गोलंदाजीत कहर