---Advertisement---
---Advertisement---

Harry Brook: भारत आणि इंग्लंड संघ लीड्सच्या लीड्सच्या मैदानावर आमनेसामने आहेत. पहिल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. भारताचा पहिला डाव 471 धावांवर आटोपल्यानंतर, इंग्लंडने 6 विकेट्स गमावून 87 षटकांत 396 धावा केल्या आहेत. त्यानंतर 88व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या प्रसिद्ध कृष्णाने भारताला हॅरी ब्रूकच्या रूपात सातवे यश मिळवून दिले. हॅरी ब्रूक खूपच दुर्दैवी ठरला आणि भारतासोबतच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावण्यात चुकला. ब्रूक अवघ्या एका धावेने शतकापासून दूर राहिला. यासह, ब्रूक भारताच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 99 धावांवर बाद होणारा इंग्लंडचा फक्त दुसरा फलंदाज बनला आहे. यापूर्वी मार्कस ट्रेस्कोथिक 2001 मध्ये अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात आपल्या शतकापासून 1 धाव दूर राहिला होता. (Harry Brook 99 dismissal)

ब्रूकला 99 धावांपर्यंत पोहोचवण्यात भारतीय क्षेत्ररक्षकांचे मोठे योगदान राहिले, ज्यांनी 1-2 नव्हे तर 3 जीवदान दिले. ब्रूकला दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात पहिले जीवदान मिळाले. जसप्रीत बुमराहने हॅरी ब्रूकला 0 धावांवर बाद केले होते, परंतु ‘नो बॉल’ मुळे भारताला विकेट मिळाली नाही. यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा ब्रूक 46 धावांवर खेळत होता, तेव्हा पंतने झेल सोडला. तिसरे जीवदान 82 धावांवर मिळाले. हे जीवदान स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षक यशस्वी जायसवालने दिले.

हॅरी ब्रूकने बुमराहच्या ऑफ स्टंपबाहेरच्या लेन्थ बॉलला प्लेस केले, पण जायसवालने सोपा झेल सोडला. अशाप्रकारे ब्रूकच्या नशिबाने तिसऱ्यांदा त्याची साथ दिली. पण, ब्रूकला चौथे जीवदान मिळू शकले नाही. प्रसिद्ध कृष्णाने ब्रूकला 99 धावसंख्येवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे ब्रूक लीड्समध्ये कसोटीत 99 धावांवर बाद होणारा इंग्लंडचा दुसरा आणि एकूण जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. (Test cricket 99 dismissals)

कसोटीत लीड्सच्या हेडिंग्लेमध्ये 99 धावांवर बाद झालेले फलंदाज
माइक एथर्टन- (1994)
सलीम मलिक- (1987)
हॅरी ब्रूक- (2025*)

कसोटीत भारताच्या विरुद्ध 99 धावांवर बाद झालेले इंग्लंडचे फलंदाज:
मार्कस ट्रेस्कोथिक, अहमदाबाद, 2001
हॅरी ब्रूक, लीड्स, 2025*

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---