मुंबई | प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत बिगर मानांकीत ईशाक ईकबालने सातव्या मानांकीत परमवीर बाजवा याचा तर तिर्थ मचेर्ला याने चौथ्या मानांकीत चंद्रील सुद याचा पराभव करत धक्कादायक निकालासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या रत्नाकर बँक लिमिटेड(आरबीएल)यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत बिगर मानांकीत ईशाक ईकबालने आपल्या धडाकेबाज कामगिरीत सातत्य राखत सातव्या मानांकीत परमवीर बाजवाचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. संघर्षपुर्ण लढतीत बिगर मानांकीत तिर्थ मचेर्ला याने चौथ्या मानांकीत चंद्रील सुदचा 1-6, 7-6(6), 6-2 असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सहाव्या मानांकीत पृथ्वी सेखर याने गोकुळ सुरेशचा 6-3, 6-1 असा तर
राघव जयसिंघानी याने लक्ष्य गुप्ताचा 3-6, 7-5, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्यपुर्व फेरी
ईशाक ईकबाल(भारत) वि.वि परमवीर बाजवा(भारत)(7)6-3, 6-2
तिर्थ मचेर्ला (भारत)वि.वि चंद्रील सुद(भारत)(4) 1-6, 7-6(6), 6-2
पृथ्वी सेखर(भारत)(6) वि.वि गोकुळ सुरेश(भारत) 6-3, 6-1
राघव जयसिंघानी(भारत) वि.वि लक्ष्य गुप्ता(भारत) 3-6, 7-5, 6-3