मुंबई। प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत बिगर मानांकीत ईशाक ईकबालने तिर्थ मचेर्लाचा व सहाव्या मानांकीत पृथ्वी सेखरने राघव जयसिंघानीचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या रत्नाकर बँक लिमिटेड(आरबीएल)यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत बिगर मानांकीत ईशाक ईकबालने आपल्या दमदार विजयी कामगिरीत सातत्य राखत तिर्थ मचेर्ला याचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. सहाव्या मानांकीत पृथ्वी सेखरने राघव जयसिंघानी याचा 6-3, 6-0 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:-
उपांत्य फेरी:-
ईशाक ईकबाल(भारत) वि.वि तिर्थ मचेर्ला (भारत) 6-3, 6-2
पृथ्वी सेखर(भारत)(6) वि.वि राघव जयसिंघानी(भारत) 6-3, 6-0