पुणे | सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत अर्न्स्ट अँड यंग संघाने हार्मन संघाचा 91 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंड्स क्रिकेट अकादमी मौदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कर्णधार चिन्मय जोशीच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर अर्न्स्ट अँड यंग संघाने हार्मन संघाचा 91 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना अर्जुन शिंदे व चिन्मय जोशी यांच्या प्रत्येकी 62 धावांसह अर्न्स्ट अँड यंग संघाने 20 षटकात 6 बाद 183 धावा केल्या. 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आकाश जाधव व चिन्मय जोशी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे हार्मन संघ केवळ 15.1 षटकात सर्वबाद 92 धावांत गारद झाला. 31 चेंडूत 62 धावा व 15 धावांत 2 गडी बाद करणारा चिन्मय जोशी सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत अरविंद चौहानच्या अष्टपैलू कामगिरीसह वेंकीज् संघाने अमेझॉन संघाचा 69 धावांनी पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
अर्न्स्ट अँड यंग- 20 षटकात 6 बाद 183 धावा(अर्जुन शिंदे 62(28), चिन्मय जोशी 62(31), राहुल प्रसाद 21(21), शाहरुख कलमानी 2-43, निशांत खंडागळे 2-24, हरेंद्र यादव 2-38) वि.वि हार्मन- 15.1 षटकात सर्वबाद 92 धावा(जस्मित सिंग 24(28), मयुर बागमार 18(17), आकाश जाधव 3-15, चिन्मय जोशी 2-15) सामनावीर- चिन्मय जोशी
अर्न्स्ट अँड यंग संघाने 91 धावांनी सामना जिंकला.
वेंकीज्- 20 षटकात 8 बाद 207 धावा(अभिनव पुरी 78(37), अरविंद चौहान 33(21), अमित सिंग 27(15), शिवराज मुळीक 3-40, रोहित कांबळे 2-31, विवेक विश्वकर्मा 1-30, अनिर्बन बॉनर्जी 1-27, प्रशांत शर्मा 1-28) वि.वि अमेझॉन- 18.4 षटकात सर्वबाद 138 धावा(शशांक कश्यप 50(33), रोहित कांबळे 31(27), रोहित गुंड 3-3, अरविंद चौहान 2-13, मयुर टिंगरे 2-8) सामनावीर- अरविंद चौहान
वेंकीज् संघाने 69 धावांनी सामना जिंकला.