मोहालीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात रविवारी(10 मार्च) झालेल्या चौथ्या वनडे सामन्यासाठी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला विश्रांती दिली होती. त्यामुळे त्याच्या ऐवजी रिषभ पंतला अंतिम 11 जणांच्या भारतीय संघात संधी देण्यात आली.
मात्र पंत या सामन्यात प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे. तसेच त्याने या सामन्यात यष्टीरक्षण करताना काही मोठ्या चूकाही केल्या आहेत. त्यामुळे मैदानात सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांनी ‘धोनी-धोनी’ असे म्हणण्यास सुरुवात केली, ज्यामुळे पंतवरील दबाव वाढला. त्याच्या या चुकांवर भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही नाराजी व्यक्त केली.
तसेच सोशल मीडियावरही पंतवर मोठ्या प्रमाणात टिका झाली. पण आता पंतचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी धोनीबरोबर होत असलेली पंतची तुलना योग्य नसल्याचे म्हटले आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सिन्हा म्हणाले, ‘अशा प्रकारची तुलना आता बस झाली. धोनीप्रमाणेच तोही(पंत) यष्टीरक्षक फलंदाज आहे. पण ही गोष्ट त्याच्यासाठी योग्य नाही. कारण ही गोष्ट त्याच्यावर विशिष्ट मार्गानेच कामगिरी करण्याचा आणि धोनीसारखे बनण्याचा अतिरिक्त दबाव टाकते. त्याचे मन जेव्हा स्वतंत्र असते तेव्हा तो उत्कृष्ट कामगिरी करतो.’
त्याचबरोबर सिन्हा यांनी धोनीच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करुन दिली आहे. तसेच धोनी जसा आत्ता आहे तसाच पूर्वी नव्हता असे म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतला काही वेळ देण्यास सांगितला आहे.
सिन्हा म्हणाले, ‘आजचा पंत आणि 14 वर्षांपूर्वीचा धोनी यांच्यात फरक आहे. जेव्हा धोनी भारतीय संघात आला होता त्यावेळी त्याच्यामागे पंत प्रमाणे कोणत्याही प्रकारचे ओझे नव्हते. तो कोणत्याही दिग्गज यष्टीरक्षकाची जागा घेत नव्हता. त्यावेळी दिनेश कार्तिक किंवा पार्थिव पटेल हे दोघे होते, जे त्याच्यासाठी तरुण होते. त्यामुळे तो(धोनी) आज पंत ज्या दबावाला आणि आपेक्षेला सामोरा जात आहे त्यापासून स्वतंत्र होता.’
पुढे सिन्हा म्हणाले, ‘जगातील कोणत्या यष्टीरक्षकाने झेल किंवा यष्टीचीतची संधी गमावली नाही? अगदी धोनीनेही त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला यष्टीचीत आणि झेल सोडले आहेत. एक चांगली गोष्ट आहे की निवडकर्त्यांनी एका मोसमानंतर त्याला( सोडले नाही. तो वेळेनुसार सुधारणा करेल आणि खेळातील दिग्गज बनेल.’
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाची धुलाई करणारा टर्नर या संघाकडून गाजवणार आयपीएल
–टेलरने ज्या खेळाडूचा विक्रम मोडला त्याचीच मागितली माफी
–रिषभ पंतच्या त्या ३ चुका पहाच, ज्यामुळे कर्णधार कोहली चिडला