पुणे। राष्ट्रीय तालीम संघाच्या अध्यक्षपदी श्री दामोदर टकले, कार्याध्यक्षपदी हिंदकेसरी पै. योगेश दोडके यांनी फेरनिवड करण्यात आली असून सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी सन २०२३ पर्यंत कार्यरत रहाणार असल्याची माहिती नवनिर्वाचित सचिव शिवाजीवराव बुचडे यांनी दिली.
आज हॉटेल ऑयासिस येथे राष्ट्रीय तालीम संघाच्या सर्व साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त नारायणराव पवार, तात्यासाहेब भिंताडे, ऑलिम्पिकवीर मारुती आडकर, अर्जुनवीर काका पवार, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, नगरसेवक सचिन दोडके, बाळासाहेब धनकवडे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय तालीम संघाच्या १८३ सभासदांपैकी सुमारे १४० सदस्य यावेळी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अर्जुनवीर काका पवार यांचे दोन्ही पठ्ठे अंतिम फेरीत पोचले होते. यास्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने विजेतेपद तर शैलेश शेळकेने उपविजेतेपद मिळवले होते. मानाच्या स्पर्धेत या दोन्ही मल्लांचे वस्ताद म्हणून अर्जुनवीर व ज्येष्ठ मार्गदर्शक काका पवार यांचा श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देवून विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
राष्ट्रीय तालीम संघाच्या सभासदांमधून पुढील कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष दामोदर टकले यांनी जाहीर केलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे ।
अध्यक्ष । दामोदर टकले
कार्याध्यक्ष । हिंदकेसरी पै. योगेश दोडके
सचिव। शिवाजीराव बुचडे
कार्यकारिणी । सुभाष पोकळे, शामराव यादव, किशोर धनकवडे, संभाजी आंग्रे, जयसिंग पवार, मधुकर फडतरे, दिलीप कांबळे, गणेश दांगट, ज्ञानेश्वर मांगडे, दत्तात्रय बालवडकर, रवी खालकर, सोमनाथ मोझे, घनश्याम घुले, योगेश पवार, रामदास माझिरे, हेमेंद्र किराड, मंगेश परांडे, सचिन शिंदे व सुनील देवकर.
पंच कमिटी । ऑलिम्पिकवीर मारुती आडकर, शामराव मते व अविनाश टकले.
आजीव सभासद । विकास लगड व कृष्णा बुचडे
राष्ट्रीय तालीम संघाला उपयोगी पडणारे । शरद निवृत्ती पवार व नीलेश दगडे