जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय निवडसमितीने केएल राहुल याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे. निवडसमितीने दुखापतग्रस्त राहुल याच्या जागी युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याला या महत्त्वाच्या सामन्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, भारतीय संघात संधी मिळण्यासाठी खेळाडूचा फॉर्म नव्हे तर मैत्री आणि वशिला लागतो असे म्हटले आहे.
https://twitter.com/ShubmanGang/status/1655540210967662592?t=PMoXvc3SvK_hKhy9Fqjt3A&s=19
भारतीय संघाची यापूर्वीच या सामन्यासाठी संघ निवड झाली आहे. मात्र, त्यानंतर अनेक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होत आहेत. आयपीएलदरम्यान केएल राहुल बाहेर झाल्याने त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. अनेकांनी आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्म दाखवलेल्या वृद्धिमान साहा याला संधी मिळावी असे म्हटलेले. मात्र, निवड समितीने ईशान किशन याला या सामन्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्याने अद्याप भारतीय संघासाठी एकही कसोटी खेळलेला नाही.
Rahane select based on IPL performance, then why not Saha, his performance 100 times better than fraud Ishan Kishan.
Ishan who doesn't done anything till now. But he selected bcoz he play in MI.
If Rahane experience matter, then why not Saha experience.#WTCFinal2023 #WTCFinal pic.twitter.com/22G78qlExI— Mohali to Melbourne 82* (@MelbourneNT82) May 8, 2023
किशन याच्या निवडीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर गुणवत्तेपेक्षा भारतीय संघात मैत्री आणि वशिला असल्यावर संधी मिळते असे म्हटले. तर, काहींनी जर अजिंक्य रहाणे आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे संघात स्थान मिळवू शकतो, तर साहा का नाही? असा सवाल केला.
https://twitter.com/ShubmanGang/status/1655540210967662592?t=PMoXvc3SvK_hKhy9Fqjt3A&s=19
या अंतिम सामन्यासाठी यापूर्वीच भारतीय संघात केएस भरत याच्या रूपाने यष्टीरक्षक उपलब्ध आहे. त्यामुळे किशन याला संधी मिळण्याची शक्यता कमी वाटते.
(Fans Slams BCCI After Selecting Ishan Kishan As KL Rahul Replacement For WTC Final Over Wriddhiman Saha)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कौतुक करावं तेवढं कमीच! KKRचा खेळाडू वेदनेने विव्हळत असताना धवनने केली मदत, व्हिडिओ जिंकेल मन
धवनचा भीमपराक्रम! फिफ्टी मारताच रचले 2 रेकॉर्ड, एका विक्रमात विराटशी बरोबरी; लगेच घ्या जाणून