20 फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगला सुरुवात झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच पीएसएलचा संपूर्ण मोसम पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र या लीगच्या दुसऱ्याच दिवशी वादग्रस्त घटना घडली आहे.
शुक्रवारी(21 फेब्रुवारी) या लीगमधील दुसरा सामना कराची किंग्स विरुद्ध पेशावर जालमी संघात पार पडला. या सामन्यादरम्यान कराची संघाचा एक सदस्य डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरताना दिसून आहे. त्यामुळे आता वाद निर्माण झाले आहेत. तसेच कराची संघाचा सदस्य फोन वापरतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.
काही रिपोर्ट्सनुसार ही संपूर्ण घटना लाईव्ह प्रसारित करण्यात आली आहे. तसेच त्यामुळे आता सोशल माडियावर कराची संघाला तसेच पीएसएलला ट्रोल करण्यात येत आहे.
क्रिकेटमध्ये सामना सुरु असताना खेळाडूंना तसेच संघातील सर्व सदस्यांना मोबाईल फोन वापरण्याची बंदी असते. अगदी आयसीसीच्या नियमानुसारही खेळाडू किंवा कोणताही संघसदस्य ड्रेसिंग रूम किंवा डगआऊटमध्ये मोबाइल फोन वापरू शकत नाही परंतु त्यांना वॉकी टॉकीवर बोलण्याची परवानगी दिली आहे. मैदानावर वॉकी टॉकी वापरायला सामानाधिकारी, खेळाडू आणि पंच यांना परवानगी असते.
डगआऊटमध्ये फोन वापरणाऱ्या कराची संघाच्या सदस्याला असे केले चाहत्यांनी ट्रोल –
Since when are mobile phones and mobile phone conversations allowed in a team dugout during a live T20 (or any) match? pic.twitter.com/O93wtx2SwE
— Peter Della Penna (@PeterDellaPenna) February 21, 2020
Its Pakistan, anything can happen
— RKM (@ranjitmakaju) February 21, 2020
New rule in #PSL you can use mobile phones in dug-outs pic.twitter.com/fGZF7LlsAi
— Quarantined Ninja (@lazyganster) February 21, 2020
Mobile phone being used in the dugout during the Karachi Kings versus Peshawar Zalmi match today #PSLV #KKvPZ pic.twitter.com/bmDi4WCeUG
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) February 21, 2020