राजकोट। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(17 जानेवारी) दुसरा वनडे सामना सुरु आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा फलंदाज केएल राहुलने खास विक्रम केला आहे.
त्याने या सामन्यात आक्रमक खेळ करताना 52 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 80 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने वनडेमध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. त्याच्या आता 28 वनडे सामन्यातील 27 डावात खेळताना 3 शतके आणि 6 अर्धशतकांसह 1016 धावा झाल्या आहेत.
त्यामुळे तो वनडेत सर्वात जलद 1000 धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि अंबाती रायडू यांना मागे टाकले आहे. या दोघांनीही प्रत्येकी 29 डावात 1000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.
🔹 80 runs
🔹 52 balls
🔹 6 fours
🔹 3 sixesKL Rahul was on 🔥 with the bat in Rajkot, and also completed 1,000 ODI runs today! #INDvAUS pic.twitter.com/1Z7u91H1RG
— ICC (@ICC) January 17, 2020
वनडेत सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर विराट कोहली आणि शिखर धवन संयुक्तरित्या आहेत. या दोघांनीही 1000 वनडे धावा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी 24 डाव खेळले होते. त्यांच्या पाठोपाठ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नवज्योत सिंग सिद्धू आहेत. त्यांनी 25 डावात 1000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.
आज सुरु असलेल्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 340 धावा केल्या आहेत. भारताकडून राहुल व्यतिरिक्त शिखर धवन(96) आणि विराट कोहलीने (78) अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
वनडेत सर्वात जलद 1000 धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
24 डाव – विराट कोहली, शिखर धवन
25 डाव – नवज्योत सिंग सिद्धू
27 डाव – केएल राहुल
29 डाव – एमएस धोनी, अंबाती रायडू
30 डाव – संजय मांजरेकर
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सचिन-लारा नंतर विराट कोहलीनेही केला तो खास विक्रम
वाचा👉https://t.co/R1KZq2BpsP👈#म #मराठी #Cricket #INDvsAUS #TeamIndia @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 17, 2020
९६ धावा करुनही शिखर धवन कमनशीबीच ठरला!
वाचा👉https://t.co/RPPjXKG7zJ👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvAUS @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 17, 2020