एकदिवसीय सामन्यात भारतीयांनी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि त्याबरोबरच खुप विक्रमसुद्धा नोंदवले आहेत. भारताने २ विश्वचषकसुद्धा जिंकले आहेत, त्यात पहिला १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा २०११ साली महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात. ह्या व्यतिरिक्त भारताची फलंदाजी नेहमीच क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे. भारताने आत्तापर्यंत अनेक चांगले फलंदाज घडवले आहेत. यात सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, विराट कोहली, रोहित शर्मा अशा अनेकांची नावे घेता येतील.
त्यातही वीरेंद्र सेहवाग,युवराज सिंग, सुरेश रैना यांससारखे खेळाडू आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. सध्याचा घडीला विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू संघात आहेत, जे जबाबदारीने फलंदाजी करण्याबरोबरच त्यांच्या आक्रमक फळंदाजीसाठी नावाजले जातात. या लेखात आपण अशा ३ भारतीय क्रिकेटपटूंचा आढावा घेऊ ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा कारनामा केला आहे.
३. विराट कोहली
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सर्वात जलद शतक करणाऱ्या भारतीयांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०१३ साली नागपूरला झालेल्या एकदिवसीय सामन्यात ६१ चेंडूत शतक ठोकले होते. ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ३५० धावांचा डोंगर उभा केला होता, त्या सामन्यात शेन वॉटसनने ९४ चेंडूत १२४ धावा केल्या होत्या आणि कर्णधार बेलीने ११४ चेंडूत १५६ धावा केल्या होत्या.
भारतीय फलंदाजांसाठी ३५० इतकी धावसंख्या गाठणे हे खूप मोठे आव्हान होते. पण रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने १७८ धावांची सुंदर सुरुवात करुन दिली. सलामी जोडी बाद झाल्यानंतर अशाच फलंदाजीची गरज होती आणि ती उणीव विराटने भरून काढली. विराटने जोरदार फलंदाजी करुन ६६ चेंडूत ११५ नाबाद धावा केल्या आणि भारताने हा सामना ६ गडी राखुन जिंकला.
२.वीरेंद्र सेहवाग
ह्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय विस्पोटक फलंदाज सेहवाग आहे. सेहवागने हा कारनामा ११ मार्च २००९ ला न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टन येथे केला होता. सेहवागने त्या सामन्यात ६० चेंडूत शतक पूर्ण केले होते. त्या सामन्यात पाऊसचा व्यत्यय आल्याकारणाने समाना निर्धारित ४० षटकांचा करण्यात आला होता. न्यूझीलंडने ४० षटकात ५ बाद २७० धावा केल्या.
भारताकडून सेहवाग आणि गौतम गंभीर ही सालमीची जोडी उतरली आणि ह्या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २३.३ षटकात २०१ धावांची जबदस्त सलामी दिली. सेहवागने ७४ चेंडूत ६ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १२५ धावांची नाबाद खेळी केली. डकवर्थ लुईसचा नियम अंतर्गत भारताने हा सामना जिंकला.
१.विराट कोहली
भारताकडून सर्वाधिक जलदगतीने १०० धावा करणारा फलंदाज म्हणजे विराट कोहली. कोहलीने २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात जयपूरमध्ये फक्त ५२ चेंडूत शतक करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा धुव्वा उडवला होता. मालिकेच्या दुसऱ्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३६० एवढी धावसंख्या उभी केली. परंतु, भारतीय संघाने हे लक्ष्य अगदी सहज पार केले. त्यात शिखर धवन आणि रोहित शर्माने १७६ धावांची सलामी भागीदारी केली. त्यात धवन ९५ धावा करून बाद झाला.
धवननंतर विराट आणि रोहितने भागीदारी करुन धावसंख्येचा पाठलाग केला. कोहल ने फक्त ५२ चेंडूत तुफानी फटकेबाजी करत शतकी खेळी साकारली. हे कोणत्याही भारतीयाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेले सर्वात जलद शतक ठरले. हा सामना भारताने जिंकला. रोहितने या सामन्यात १२३ चेंडूत १४१ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
वनडेत एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारे तीन भारतीय, एक तर आहे दिग्गज गोलंदाज
असे ५ खेळाडू, जे विश्वचषक २०२३ मध्ये भारताकडून बजावू शकतात फिनिशरची भूमिका
‘त्या’ चेंडूनंतर पृथ्वी शॉने ठरवले एका षटकात ६ चौकार मारायचे