मेलबर्न। आज(22 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये(Australian Open 2020) दुसऱ्या फेरीत स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररचा(Roger Federer) सामना सार्बियाच्या फिलिप क्रॅजिनोविच(Filip Krajinovic) विरुद्ध झाला. या सामन्यात फेडररने विजय मिळत 21 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
1 तास 32 मिनिटे चाललेल्या या लढतीत फेडररने 6-1, 6-4,6-1 अशा सरळ तीन सेटमध्ये क्रॅजिनोविचला पराभूत केले. फेडररने क्रॅजिनोविचविरुद्ध विजय मिळवण्याची ही चौथी वेळ आहे.
तसेच ऑस्ट्रेलियन ओपनमधील फेडररचा हा 99 वा विजय होता. त्यामुळे आता त्याला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 100 वा विजय मिळवण्याची तिसऱ्या फेरीत संधी आहे. त्याने याआधी विंबल्डन ग्रँडस्लॅममध्ये 101 विजय मिळवले आहेत. त्यामुळे एका ग्रँडस्लॅममध्ये 100 विजय मिळवणारा तो पहिला टेनिसपटू आहे.
आज ऑस्ट्रलियन ओपनमध्ये विजय मिळवल्यानंतर फेडरर म्हणाला, ‘मी आनंदी आहे. यावर्षीच्या मोसमाची चांगली सुरुवात झाली आहे.’
राॅजर फेडरर
२१व्यांदा #AusOpen च्या तिसऱ्या फेरीत
तिसऱ्या फेरीत फेडररचे १७विजय आणि ३ पराभव
९९- ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजय#म #मराठी— Sharad Bodage (@SharadBodage) January 22, 2020
यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिसऱ्या फेरीत फेडररचा सामना ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅनशी(John Millman) होणार आहे. मिलमॅनने दुसऱ्या फेरीत हबर्ट हर्केझचा 6-4.7-5,6-3 अशा फरकान पराभव करुन तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
आता फेडरर आणि मिलमॅनमध्ये 24 जानेवारीला तिसऱ्या फेरीतील सामना होईल. याआधी फेडरर आणि मिलमॅन 3 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये फेडररने 2 वेळा तर मिलमॅनने 1 वेळा विजय मिळवला आहे.
राॅजर फेडररचे ग्रॅंडस्लॅममधील विजय
101 – विंबल्डन
99*- ऑस्ट्रेलियन ओपन
89 – युएस ओपन
70 – फ्रेंच ओपन
रोहितचे पुढील दोन महिने हा गोलंदाज करु शकतो खराब
वाचा- 👉https://t.co/WjhZZq1HjF👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
एकेवेळी फिटनेसवरुन प्रश्न उपस्थित केलेल्या खेळाडूने त्रिशतकी खेळीने विराटला दिले जोरदार उत्तर
वाचा👉https://t.co/bYWoEHSaoc👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #RanjiTrophy— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020