मॉस्को। 21व्या फिफा विश्वचषकाला फक्त तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यासाठी आधीच्या विश्वचषकांमधील काही मनोरंजक बाबी.
फिफा विश्वचषकातील एका सामन्यात जास्त गोल करणारे संघ हा त्यातीलच एक अनोखा विक्रम.
1954 स्विझरलॅंड फिफा विश्वचषक ऑस्ट्रिया विरूद्ध स्विझरलॅंड (12 गोल)
1954चा स्विझरलॅंडमधील फिफा विश्वचषक हा एका वेगळ्याच कारणास्तव चाहत्यांच्या लक्षात राहिला आहे. या विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात चक्क 12 गोल केले गेले.
हा सामना ऑस्ट्रिया विरूद्ध स्विझरलॅंड यांच्यात झाला. यामध्ये ऑस्ट्रियाने 7-5 असा स्विझरलॅंडचा पराभव केला.
हा फिफामधील एक ऐतिहासिक क्षण ठरला. स्विझरलॅंड मधील लुसने येथे झालेल्या या सामन्यावेळी 40 डिग्री सेल्सियस एवढे तापमान होते. म्हणून या, सामन्याला ‘हिट बॅटल ऑफ लुसने’ असेही म्हणतात.
ऑस्ट्रियाचा थियोडोर वॅगनर याने या सामन्यात तीन गोल केले. तर स्विझरलॅंडकडून सिप हूगीनेही तीन गोल केले.
1938 फ्रांस फिफा विश्वचषक ब्राझिल विरूद्ध पोलंड (11 गोल)
1938चा फ्रांस फिफा विश्वचषकातही एका सामन्यात 11 गोल केले गेले. हे गोल ब्राझिल विरूद्ध पोलंड मधील पहिल्या फेरीच्या सामन्यात केले होते.
हा सामना ब्राझिलने 6-5ने जिंकला. यामध्ये ब्राझिलकडून लियोनिदास द सिल्वाने तीन गोल केले होते.
या विश्वचषकात सिल्वाने एकूण 7 गोल केले आहेत.
1954 स्विझरलॅंड फिफा विश्वचषक हंगेरी विरूद्ध जर्मनी (11 गोल)
या स्पर्धेतील साखळी सामन्यात हंगेरीने जर्मनी विरूद्ध 8 गोल केले होते. यामध्ये हंगेरीच्या सॅंडॉर कोक्झिस या एकट्यानेच 4 गोल केले होते. हा सामना हंगेरीने 8-3 असा जिंकला.
कोक्झिसने फिफा विश्वचषकातील 5 सामन्यात एकूण 11 गोल केले आहेत. असा करणारा तो फक्त सहावा खेळाडू आहे.
1982 स्पेन फिफा विश्वचषक हंगेरी विरूद्ध जर्मनी (11 गोल)
1982चा स्पेनमधील फिफा विश्वचषकात पण एका संघाने 11 गोल केले होते. यात हंगेरीने एल साल्वादोरला 10-1 ने पराभूत केले.
हंगेरीकडून लॅझ्लो किस याने 3 तर एल साल्वादोरकडून लूईस रॅमीरेजला एक गोल करण्यात यश आले.
1958 स्वीडन फिफा विश्वचषक फ्रांस विरूद्ध पॅराग्वे (10 गोल)
1958चा स्वीडन फिफा विश्वचषकातील साखळी फेरीमधील ग्रुप 2 मध्ये फ्रांस विरूद्ध पॅराग्वे सामन्यात 10 गोल केले होते.
हा सामना फ्रांसने 7-3 ने जिंकला होता. यामध्ये जस्ट फौंटेनने फ्रांसकडून तर फ्लोरन्सियो अॅनारिलाने पॅराग्वेकडून 3 गोल केले.
फौंटेनने फिफा विश्वचषकातील 6 सामन्यात 13 गोल केले आहेत. तो फिफा विश्वचषकात जास्त गोल करणाऱ्यामध्ये चौथ्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–फिफा विश्वचषक 2018: तिकीट खरेदीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर
–रोनाल्डो-मेस्सी बरोबर माझी तुलना करणे अयोग्य- सुनिल छेत्री
–फिफा विश्वचषक २०१८- ओळख ड गटाची
–भारताचा स्टार फुटबाॅलपटू लिओनेल मेस्सीला पडतोय भारी!
–फुटबॉल फॉर्मेशन म्हणजे नक्की काय रे भाऊ?