रशिया। 21व्या फिफा विश्वचषकातील दुसरा सामना इजिप्त विरुद्ध उरुग्वे यांच्यात झाला. यात उरुग्वेने इजिप्तला 1-0 असे पराभूत केले.
उरुग्वेचा डिफेंडर जोस गमेनेझने दुसऱ्या सत्रातील 89व्या मिनीटाला गोल करून उरुग्वेला 1-0 असा विजय मिळवून दिला. या विजयामुळे उरुग्वेला पूर्ण तीन गुण मिळाले असून ते अ गटात सौदी अरब नंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
एक सत्र होऊन सुद्धा इजिप्त आणि उरुग्वे 0-0 होते. तसेच 1970 नंतर प्रथमच उरुग्वेने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे.
आजच्या सामन्यात इजिप्तचा स्ट्रायकर मोहम्मद सालाह खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे फिट असूनही 11जणांच्या संघात नव्हता.
तसेच उरुग्वेकडे एडिसन कवानी आणि लुईस सुवारेज हे दोन अत्यंत चांगले अटॅकर आहे. या सामन्याला सुरूवात सुवारेजने केली. या दोघांनी गोल करण्याच्या काही निर्माण केल्या मात्र यात त्यांना अपयश आले.
उरूग्वे आणि बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू फॉरवर्ड लुईस सुवारेज खेळातील 24व्या मिनीटाला गोल करण्यास मुकला.
मागच्या विश्वचषकात सुवारेजने इटलीचा डिफेंडर जियोर्जियो चिपेलनीला चावला होता. यामुळे त्याला फुटबॉलच्या सर्व स्पर्धांमधून चार महिन्यांसाठी बाद केले होते.