---Advertisement---

FIFA WORLD CUP: चार वेळेचा ‘चॅम्पियन’ जर्मनीची डोकेदुखी वाढली! स्पेनविरुद्धचा सामना सुटला बरोबरीत

---Advertisement---

कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2022च्या स्पर्धेत जर्मनी विरुद्ध स्पेन Germany vs Spain) सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. या अनिर्णीत निकालामुळे जर्मनीच्या पुढील फेरीत जाण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे, तर स्पेन संघ ग्रुप ई मध्ये पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे जर्मनीने एक अंक मिळवत चौथे स्थान गाठले आहे. जर्मनीचा शेवटचा साखळी सामना कोस्टा रिका विरुद्ध आहे.

स्पेन विरुद्ध जर्मनी सामना सोमवारी (28 नोव्हेंबर) भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 12.30 खेळला गेला. हा सामना अल बेयत स्टेडियममध्ये खेळला गेला. 2010चा विजेता संघ स्पेनला जर्मनीविरुद्ध ड्रॉवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या सामन्यात दोन्ही गोल सब्स्टीट्यूट खेळाडूंनी केले.

स्पेनकडून अल्वारो मोराटा आणि जर्मनीकडून निक्लस फुलक्रग यांनी गोल केले. चार वेळेचा जर्मनी संघाला आता पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठी कोस्टा रिकाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागणार आहे. तर स्पेननेही जपानला पराभूत केले तर जर्मनीसाठी फायद्याचे ठरणार आहे.

या सामन्याच्या पहिल्या सत्रात एकही गोल झाला नाही. स्पेनचे बॉलवर वर्चस्व होतो, मात्र जर्मनीचा काउंटर ऍटॅकही तेवढाच जबरदस्त होता. सातव्या मिनिटाताच स्पेनच्या दानी ओलमो गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, मात्र जर्मनीचा गोलकिपर मॅन्युएल नेऊर याने उत्तम बचाव केला.

त्याचबरोबर 33व्या मिनिटाला फेरान टोरेस याच्याकडेही गोल करण्याची संधी होती, परंतु त्याने बॉल क्रॉसबारच्या बाहेर पोहोचवला. दुसरीकडे जर्मनीच्या एंटोनियो रुडिगर याने हेडरने बॉल गोलपोस्टमध्ये पोहोचवला, मात्र व्हिडिओ असिस्टेंट रेफरी (VAR) च्या मदतीने त्याचा गोल ऑफ साइड ठरवला गेला आणि पहिले सत्र 0-0 असे बरोबरीत राहिले.

दुसऱ्या सत्रात स्पेनने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि त्याचा परिणाम दिसला. 62व्या मिनिटाला जॉर्डी अल्बा याच्या उत्तम क्रॉसला अल्वारो मोराटा याने गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. जर्मनी मागे पडल्याने कोच हांसी फ्लिक यांनी 70व्या मिनिटाला थॉमस मुलेर याच्या जागी  निक्लस फुलक्रग (Niclas Fullkrug) याला मैदानात पाठवले. त्याने 83व्या मिनिटाला गोल करत सामना 1-1 बरोबरीत केला. यानंतर दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले आणि सामना बरोबरीत राहिला.

जर्मनीने या विश्वचषकातील पहिला सामना हरला आणि दुसरा सामना अनिर्णीत राहिल्याने गुणतालिकेत चौथे स्थान गाठले. खरे तर सामना ड्रॉ झाल्याने जर्मनीच्या पुढच्या फेरीच्या आशा अजुनही जिवंत आहे. स्पेन ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर असला तरी अद्याप त्यांनी अंतिम 16 च्या फेरीत स्थान निश्चित केलेले नाही. FIFA WORLD CUP 2022 Spain vs Germany group e match draw

जर्मनीने 1954, 1974, 1990 आणि 2014मध्ये विश्वचषक जिंकला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ फलंदाज घेऊ शकतो रिषभ पंतची जागा, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये
पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर विलियम्सनची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मागच्या सामन्यात…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---