कतार येथे सुरू असलेल्या फिफा अनपेक्षित निकालांचे सत्र सुरूच आहे. अर्जेंटिना आणि जर्मनीनंतर आणखी एक बलाढ्य संघ दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाकडून पराभूत झाला. फिफा क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमला हरवत फिफा क्रमवारीत 22 व्या क्रमांकावर असलेल्या मोरोक्कोने सर्वांना चकित केले.
अल थुमामा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मोरोक्कोने सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये केलेल्या दोन उत्कृष्ट गोलच्या जोरावर बेल्जियमचा 2-0 असा पराभव केला. त्यांचा हा विश्वचषकातील पहिला विजय ठरला. या सामन्यात विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्याची संधी बेल्जियम संघाला होती. मात्र, आता त्यांना यासाठी शेवटच्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. अंतिम साखळी सामन्यात ते क्रोएशियाशी भिडतील.
The Atlas Lions get a huge win over Belgium.@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 27, 2022
केविन डी ब्रुऊएने तसेच गोलकीपर थिबॉस कोर्टाइस या सुपरस्टार खेळाडूंच्या उपस्थितीत खेळत असलेल्या बेल्जियम संघ सुरुवातीपासून अपेक्षित सापडली नाही. त्यांची अनेक आक्रमणे मोरोक्कोच्या मध्य फळीने व बचाव फळीने मिळून परतावून लावली. पहिल्या हाफच्या अखेरीस हकीमी याने मोरोक्कोसाठी गोल केला. मात्र, रेफ्रींनी तो गोल ऑफ साईड ठरवला.
दुसऱ्या हाफमध्ये बेल्जियम संघ काहीसा संथ दिसला. याचा फायदा घेत हकिमी सातत्याने बेल्जियमच्या गोलपोस्टवर हल्ले करत होता. अखेरीस 73 व्या मिनिटाला त्याच्या पासवर साबिरीने गोल झळकावत मोरोक्कोला आघाडीवर नेले. ही पिछाडी भरून काढण्यासाठी बेल्जियमने दुखापतीनेग्रस्त असलेला स्टार स्ट्रायकर रोमेलू लुकाकू याला मैदानावर उतरवले. मात्र, त्यांना याचा फायदा झाला नाही. अतिरिक्त वेळेत अबूखलालने आणखी एक गोल करत मोरोक्कोचा विजय नक्की केला.
बेल्जियमने आपल्या पहिल्या सामन्यात कॅनडावर 1-0 असा विजय मिळवला होता. आता उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना मागील विश्वचषकाचे उपविजेते क्रोएशिया यांना पराभूत करणे अनिवार्य आहे.
(FIFA WORLD CUP Morocco Upset Belgium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्याची देविका घोरपडे स्पेनमध्ये चमकली! युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकले गोल्ड
पाणी काढण्यासाठी सूर्या स्वतः उतरला मैदानात, व्हिडिओ होतोय व्हायरल