पुणे । राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे व नेस्टअवे, फास्ट अँड अप, स्कार्टर्स, मॅकडॉनडल्स, झुमकार, उबेर इट्स, रॅडिसन ब्लू(हिंजेवाडी) संलग्नतेने आयोजित तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीत फिनआयक्यु संघाने बारक्लेज संघाचा 5-0 असा कॅपजेमिनी संघाने सनगार्ड एएस संघाचा 4-0 असा तर टेक महिंद्रा संघाने अमेझॅन संघाचा 4-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रकाश टी याच्या हॉट्रीक कामगिरीच्या जोरावर फिनआयक्यु संघाने बारक्लेज संघाचा 5-0 असा पराभव केला. यात श्रिकांत मोलंगिरी याने दोन गोल करत संघाचा डाव भक्कम केला. सिमेंटेक संघाने एसीएन संघाचा 3-1 असा तर केपीआयटी सघआने वोडाफोन व कॉग्निझंट संघाने युबीसॉफ्ट संघाचा प्रत्येकी 2-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
फिनआयक्यु – 5(प्रकाश टी 5, 8, 12मी, श्रिकांत मोलंगिरी 14, 17 मी) वि.वि बारक्लेज- 0
सिमेंटेक- 3(नविन सिंग 6मी, शानुप नायर 9मी, रोहित ठाकुर 15मी) वि.वि एसीएन – 1(पार्थ कैल 12मी)
केपीआयटी- 2(अल्बी अब्राहीम 10मी, अंगद सिंग 14मी) वि.वि वोडाफोन- 0
कॉग्निझंट- 2(सौरभ मुळीक 8मी, अपुर्व टोपो 16मी) वि.वि युबीसॉफ्ट- 0
कॅपजेमिनी – 4(रामनाथ व्ही 4, 10मी, श्रेयश धवले 12मी, दिबेंदू मंडल 14मी) वि.वि सनगार्ड एएस- 0
टेक महिंद्रा – 4(आकाश डब्ल्यु 5मी, प्रतिक सालोसकर 8मी, स्मितेश भट 11मी, विक्टर एग्रे 17मी) वि.वि अमेझॅन- 0