पुणे। टेक महिंद्रा, बीएनवाय मेलन या संघांनी प्रथम व्हिन्टेज कप आयटी टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
नेहरू स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत टेक महिंद्रा संघाने स्प्रिंगर नेचर संघावर ८ गडी राखून मात केली. टेक महिंद्राच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून स्प्रिंगर नेचर संघाला ८ बाद १२६ धावांत रोखले. स्प्रिंगर नेचर संघाकडून अविनाश अंबळेने सर्वाधिक ३७ धावा केल्या. टेक महिंद्राकडून स्वप्नील सावगवेने तीन, तर सुमीतसिंगने दोन गडी बाद केले. टेक महिंद्रा संघाने विजयी लक्ष्य १४.३ षटकांत २ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात रजत भट्टलवारने ४० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ५९ धावा केल्या. अमितोष निखरने २९ चेंडूंत ३८ धावा करून त्याला चांगली साथ दिली.
यानंतर झालेल्या दुस-या लढतीत बीएनवाय मेलन संघाने डॉश्चे संघावर १० धावांनी मात केली. मेलन संघाकडून ७ बाद १३७ धावा केल्या. यात अविरल शर्माने सर्वाधिक ४० धावा केल्या. डॉश्चे संघाकडून बिस्वरंजन साहूने तीन गडी बाद केले. डॉश्चे संघाला ९ बाद १२७ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक – १) स्प्रिंगर नेचर – २० षटकांत ८ बाद १२६ (अविनाश अंबळे ३७, राहुल नागडे १७, सतीश पाटील १७, स्वप्नील सावगवे ३-२२, सुमीतसिंग २-२०) पराभूत वि. टेक महिंद्रा – १४.३ षटकांत २ बाद १३० (रजत भट्टलवार नाबाद ५९, अमितोष निखर ३८, राजीव शेखर २-२१).
२) बीएनवाय मेलन- २० षटकांत ७ बाद १३७ (अविरल शर्मा ४०, शैजू थॉमस १६, बिस्वरंजन साहू ३-२७, गौरव सचदेव २-२०) वि. वि. डॉश्चे – २० षटकांत ९ बाद १२७ (प्रथमेश थोरात ३८, तरणदीपसिंग २४, शुवरा बदुरी २२, प्रकाशकुमार ३-२२, अविरल २-१८).