नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याची सुरुवात आता झाली असून, बीसीसीआयने संपूर्ण निवड समितीच अध्यक्षांसह बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर बीसीसीआयने लगेच नव्या निवडसमितीसाठी अर्ज देखील मागवले आहेत. आता भारताचे चार माजी क्रिकेटपटू निवड समिती बनण्यासाठी इच्छुक असल्याची बातमी समोर येत आहे.
नव्या निवड समिती सदस्यपदासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये पात्र ठरणाऱ्या काही भारतीय खेळाडूंनी आपण या पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन या पदासाठी मुख्य दावेदार मानले जात आहेत. त्यांची दक्षिण विभागातर्फे वर्णी लागू शकते. ते 2020 मध्ये या पदासाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळी सुनील जोशी यांना प्राधान्य दिले गेलेले. याव्यतिरिक्त पश्चिम विभागातर्फे सलील अंकोला, माजी यष्टीरक्षक समीर दिघे तसेच अजित आगरकर हे इच्छुक आहेत. अनुभवाचा विचार केल्यास आगरकर यांना प्राधान्य दिले जाऊ शकते. तसेच भारताचे माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया हे देखील निवड समिती सदस्य बनण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते.
हे आहेत निकष:
निवड समिती सदस्य पदासाठी अर्ज करणारा व्यक्ती भारताचा माजी क्रिकेटपटू असणे आवश्यक आहे. त्याने सात कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने खेळले असावे. किंवा 10 वनडे व 20 प्रथम श्रेणी सामने खेळणे गरजेचे आहे. तसेच, सदर उमेदवार हा पाच वर्षांपूर्वी क्रिकेट मधून निवृत्त झालेला असावा. या सर्व गटात बसणारा उमेदवारच अंतिम मुलाखतीसाठी पात्र ठरेल. सर्व उमेदवारांना आपला अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 28 नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत देण्यात आली आहे.
(Five Ex Indian Cricketers Intrested In New Selection Committee)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझी इच्छा आहे, पण आता फक्त एकच सामना राहिलाय’, वाचा काय म्हणाला कर्णधार हार्दिक
विराटपेक्षा सूर्याच भारी! विश्वास बसत नसेल, तर ‘ही’ आकडेवारी पाहाच