2023 वर्ष क्रिकेट फॉलो करणाऱ्यांसाठी अनेक कारणास्तव खार ठरले. यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषक, त्याआधी आशिया चषक, ऍशेस, बॉर्डर गावसकर ट्रॉफी अशा अनेक महत्वाच्या मालिका खेळल्या गेल्या. यावर्षी रिंकू सिंग सारख्या युवा खेळाडूने आपली छाप सोडली, तर ग्लेन मॅक्सवेल आणि रविंद्र जडेजा या दिग्गजांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. चला तर एक नजर टाकू वर्षभरातील काही खास क्षणांवर, ज्यामुळे चाहत्यांची मने सुखावली.
भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास –
महिला क्रिकेटसाठी 2023 वर्ष विक्रमांनी भरलेले होते. भारतीय महिला संघाने वर्षाच्या शेवटी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळला. भारताने हा सामना 8 विकेट्सने जिंकला आणि मोठा विक्रम नावावर केला. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भारतीय महिला संघआने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला मात दिली. ऑस्ट्रेलियाने या सामन्याच्या पहिल्या डावात 219 आणि दुसऱ्या डावात 261 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 2 विकेट्सने विजय मिळवला. त्याआधी भारताने मायदेशात इंग्लंडला कसोटी मालिकेत पराभूत केले होते.
रिंकू सिंग याचे पाच षटकार –
कोलकाता नाईट रायडर्सचा युवा खेळाडू रिंकू सिंग आयपीएल 2023 मध्ये चमकला. त्याने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाला एकट्याच्या जोरावर मात दिली. या सामन्यात शेवटच्या षटकात शेवटच्या पाच चेंडूवर रिंकूने पाच षटकार मारले आणि कोलकाताने हा सामना जिंकला होता. युवा वेगवान गोलंदाज यश दयाल या षटकात गोलंदाजी करत होता. रिंकूने या आयपीएल सामन्यात 21 चेंडूत 228.57च्या स्ट्राईक रेटने 48 धावाची खेळी केली. यात 1 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या वादळी फलंदाजीच्या जोरावर कोलकाताला विजय मिळाला.
एमएस धोनीची रविंद्र जडेजाला मिठी –
आयपीएल 2023च्या अंतिम सामन्यात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमने सामने होते. रविंद्र जडेजा याने शेवटच्या दोन चेंडूवर 10 धावा संघाला मिळवून दिल्या आणि चेन्नईने आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी उंचावली. शेवटच्या चेंडूवर सीएसकेला चार धावा हव्या होत्या. स्ट्राईकवर असणाऱ्या रविंद्र जडेजाने दबाव न घेत शेवटच्या चेंडूवर चौकार मारला आणि सीएसकेने सामना जिंकला. चौकार मारताच जडेजा सीमारेषेबाहेर बसलेल्या एमएस धोनीच्या दिशेने धावत सुटला. जडेजा त्याच्यावळ आल्यानंतर धोनीनेही अष्टपैलू खेळाडूला उचलून घेतले. हा भावूक क्षण चाहत्यांच्या आजही आठवणीत आहे. नेहमी शांत राहणारा धोनी खूप कमी वेळा अशा पद्धतीने भावूक झाल्याचे चाहत्यांना पाहायला मिळाले आहे.
ग्लेन मॅक्सवेल याचे द्विशतक –
वनडे विश्वचषकादरम्यान ग्लेन मॅक्सवेल याने एक अशी खेळी केली, ज्याचे कौतुक प्रत्येकाकडून झाले. अफगाणिस्तानविरुद्धच्या या विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पराभूत होणार, असे सर्वांना वाटत होते. पण संघ पराभवाच्या जवळ असताना ग्लेन मॅक्सवेलने स्ट्राईक लावून धरली. मॅक्सवेलच्या पायाच्या शिरा ताणल्या गेल्याने त्याला धावता येत नव्हते. पण अष्टपैलू तरीही मैदनातून बाहेर गेला नाही. मॅक्सवेलने या सामन्यात 128 चेंडूत 201* धावांची जबरदस्त खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिली. यात 21 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने तीन विकेट्स राखून विजय मिळवला.
विराट कोहलीचे 50वे वनडे शतक –
वनडे विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली याने कारकिर्दीतील 50वे वनडे शतक पूर्ण केले. या शतकासोबतच विराटने महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला मागे टाकले. विराटने हे शतक केले तेव्हा सचिन तेंडुलकर मैदानात उपस्थित होता. विराटने सचिनकडे पाहून अभिवादन दिले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील हा क्षणाची क्रीडा जगतात चांगलीच चर्चे झाली.
मोहम्मद शमीचे पुनरागमन –
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यासाठी 2023 वर्ष खऱ्या अर्थाने चित्र बदलणारे ठरले. शमी वर्षभरात जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नव्हता. पण अनुभव आणि प्रदर्शनाच्या जोरावर त्याला वनडे विश्वचषकासाठी संघात निवडले गेले. पण पहिल्या चार सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजाला संधी मिळाली नाही. हार्दिक पंड्या दुखापतीमुुळे विश्वचषकातून बाहेर झाल्यानतंर पुढच्या सामन्यांमध्ये शमी प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला आणि संघासाठी निर्णायक भूमिकाही पार पाडली. त्याने विश्चषकात खेळलेल्या सात सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या आणि मॅच विनरची म्हणून स्वतःला सिद्ध केले. (Five moments in 2023 for cricket fans that everyone will remember)
महत्वाच्या बातम्या –
गिलने ‘ही’ गोष्टीवर नियंत्रणात मिळवले पाहिजे, कसोटीत यश मिळवण्यासाठी मिळाला दिग्गजाचा सल्ला
आकाश चोप्राने निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’, ‘या’ चार भारतीयांना दिलं स्थान