ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक अँथनी स्टुअर्ट यांचा आज (२ जानेवारी) ५१ वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी १९७० साली ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समधील न्यूकास्टल शहरात स्टुअर्ट यांचा जन्म झाला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाच सामने खेळण्याचीही संधी मिळाली नाही. तरीही एका शानदार विक्रमासाठी आजही त्यांची आठवण काढली जाते.
स्टुअर्ट यांनी ५ जानेवारी १९९७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर केवळ २ वनडे सामने खेळत त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर पूर्णविराम लागला. मात्र अवघ्या ११-१२ दिवसांच्या कारकिर्दीतीत या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता.
१६ जानेवारी १९९७ रोजी मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात वनडे सामना झाला होता. या सामन्यात स्टुअर्ट यांनी इजाज अहमद, मोहम्मद वसीम आणि मोईन खान यांच्या सलग तीन विकेट घेत हॅट्रिक नोंदवली होती. यासह ऑस्ट्रेलिया संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारे ते दुसरे गोलंदाज ठरले होते.
याच सामन्यात स्टुअर्ट यांनी १० षटके गोलंदाजी करत २६ धावांवर ५ गडी बाद केले होते. ही त्यांची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना सामनावीर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
Happy birthday, Anthony Stuart!#DidYouKnow he played just three ODIs but was only the second Australia bowler to take a hat-trick in the format 😮
He achieved the feat against Pakistan in 1997 and ended up with impressive figures of 5/26 in the match 👏 pic.twitter.com/UTKZ6cTyXy
— ICC (@ICC) January 2, 2021
याव्यतिरिक्त स्टुअर्ट यांनी न्यू साउथ वेल्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी २६ प्रथम श्रेणी सामने खेळत ७० विकेट्स घेतल्या होत्या. तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये २७ सामने खेळत ४५ विकेट्सची कामगिरी केली होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण क्षेत्राचा मार्ग निवडला. न्यूझीलंडच्या वेलिंग्टन फायरवर्ड या प्रथम श्रेणी संघाला त्यांनी प्रशिक्षण दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अरर..!! चाहत्याने भरलेलं ‘ते’ बिल भारतीय क्रिकेटर्सच्या आलं अंगलट; पंतच्या चूकीचा होणार तपास
लॅब्यूशानेने घेतला भारतीय गोलंदाजांचा धसका, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सावध राहण्याचा केला इशारा
‘तो’ क्रिकेटर म्हणजे भारताचा भविष्यातील स्टार गोलंदाज, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले नाव