मुंबई । माजी भारतीय सलामीवीर फलंदाज चेतन चौहानच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट व क्रीडा प्रेमी अद्याप सावरलेले नाहीत की, चार दिवसांतच आणखी एक धक्का बसला. चेतन चौहान यांचे रविवारी निधन झाले. त्यानंतर बुधवारी माजी क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन यांनीही जगाचा निरोप घेतला. कस्तुरीरंजन यांचे बुधवारी त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (केएससीए) कोषाध्यक्ष आणि प्रवक्ते विनय मृत्युंजय यांनी पीटीआयला सांगितले की, ‘जी कस्तुरीरंजन यांचे बुधवारी सकाळी निधन झाले.’ चमराजपेट येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. कस्तुरीरंजन 89 वर्षांचे होते आणि ते माजी क्रिकेटपटू, प्रशासक आणि बीसीसीआयचे क्युरेटर होते.
https://www.instagram.com/p/CEEBfnnj9Zq/
डाव्या हाताने वेगवान गोलंदाज करणारे कस्तुरीरंजन 1948 ते 1963 दरम्यान म्हैसूरच्या रणजी संघाकडून क्रिकेट खेळले. त्यांनी 36 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी 94 विकेट्स घेतल्या. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी ट्विट केले की,” जी. कस्तुरीरंजन यांच्या मृत्यूची बातमी ऐकून वाईट वाटले. क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची आठवण काढली जाईल. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.”
Sad to hear about the passing of G Kasturirangan. He will be fondly remembered for all his contributions to cricket. Heartfelt condolences to his family. 🙏🏽
— Anil Kumble (@anilkumble1074) August 19, 2020
केएससीएने शोक संदेशात म्हटले आहे की, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापकीय समितीचे सदस्य माजी रणजी खेळाडू, केएससीएचे माजी उपाध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी क्युरेटर जी कस्तुरीरंजन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहोत.