भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा चौथा आणि निर्णायक कसोटी सामना १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ २९४ धावांवर सर्वबाद झाल्याने भारताला चौथ्या डावात विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र या सामन्यात पहिल्या दिवसापासून पावसाने अडथळा आणल्याने काही षटकांचे याआधीच नुकसान झाले आहे, तसेच पाचव्या दिवशीही पाऊस पडण्याचे भाकीत असल्याने सामना अनिर्णीत राहण्याची अधिक शक्यता आहे.
अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाने पावसाचा अंदाज आधीच घेऊन डाव घोषित करायला हवा होता, असे मत काही ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी आजच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मांडले. पावसाची शक्यता वर्तविली गेली असतानाही ऑस्ट्रेलियाने डाव घोषित न केल्याने या दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलेन बॉर्डर म्हणाले, “पावसाचा जोर पाहता कांगारूनी डाव घोषित करून भारताला लवकर फलंदाजीसाठी आमंत्रित करायला हवे होते. सध्याची परिस्थिती पाहता मी असं म्हणेन की ऑस्ट्रेलियाने उशिरा डाव घोषित केला. माझ्या मते टी टाईम पर्यंत २७५ ऐवजी ३०० धावा व्हायला हव्या होत्या. म्हणजे आपण डाव घोषित करू शकलो असतो आणि आत्तापर्यंत गोलंदाजी करत असतो.”
ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने देखील बॉर्डर यांच्या मताशी सहमती दर्शवली. तो म्हणाला, “या सगळ्या प्रकारावर मला असे वाटते की ऑस्ट्रेलियाने पावसाचा विचार करून तयारीच केली नव्हती. हवामान विभागाचा अंदाज माहिती असूनही हे असे वागणे, आश्चर्यकारक होते. एकदा पाऊस आला की मग संपूर्ण खेळ नशिबावर अवलंबून होऊन जातो.”
माजी खेळाडू मार्क वाॅने देखील ऑस्ट्रेलियाच्या आक्रमकतेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “ऑस्ट्रेलियाची रणनिती अनाकलनीय होती. त्यांनी सुरुवातीपासून फटके खेळण्याचे धोरण ठेवले. गोलंदाजी चांगली होत होती हे मला मान्य आहे पण ते अजून सकारात्मक दृष्टीकोन ठेवू शकत होते.”
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा काय डोकं चालवलंय! चेंडू चमकवण्यासाठी मयंकने शार्दुलच्या हातावर घासला चेंडू, पाहा व्हिडिओ
शब्बास रे पठ्ठ्या! सिराजने पदार्पणाची मालिका खेळतानाच मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
ऑस्ट्रेलियाच्या या गोलंदाजाने शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला….