मँचेस्टर। आज(27 जून) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध विंडीज संघात 34 वा सामना पार पडणार आहे. पण या सामन्याआधी भारताच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीचा समस्या जाणवत आहेत. याबद्दल या क्रमांकावर भारताचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवला संधी द्यावी, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनी मांडले आहे.
चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीबद्दल आयएएनएसशी बोलताना गायकवाड म्हणाले, ‘केदार जाधव हा हुशार क्रिकेटपटू आहे. तो व्यस्त खेळाडू आहे आणि स्ट्राईक रोटेट करु शकतो. तसेच तो त्याचे फटकेही खेळू शकतो. मला वाटते त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी.’
याबरोबरच गायकवाड यांनी दिनेश कार्तिक हा देखील चांगला पर्याय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘दुसरा पर्याय दिनेश कार्तिक आहे. त्याला अनुभव आहे आणि त्याने फिनिशर म्हणून सिद्ध केले आहे. तो खेळपट्टीवर त्याचा वेळ घेतो आणि ही गोष्ट भारताला अडचणीच्यावेळी महत्त्वाची ठरेल. तूम्हाला विराटबरोबर खेळण्यासाठी कोणाचीतरी गरज आहे.’
तसेच पंतबद्दल बोलताना गायकवाड म्हणाले, ‘तो सध्यातरी माझा चौथ्या क्रमांकासाठी पंसंती नाही. तो चेंडू फटकवणारा चांगला स्ट्रायकर आहे. पण त्या जागेवर तूम्हाला खेळपट्टीवर टिकून राहणाऱ्या खेळाडूची गरज आहे. मला वाटत नाही मी त्याला त्या जागेवर खेळवेल.’
याबरोबरच गायकवाड यांनी अफगाणिस्तान विरुद्ध भारतीय फलंदाजांनी निवडलेल्या फटक्यांबद्दल टिकाही केली आहे.
भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन विश्वचषकातून बाहेर पडल्याने केएल राहुल रोहित शर्माबरोबर सलामीला उतरतो, त्यामुळे भारतासमोर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीचा प्रश्न उभा आहे.
भारताने मागील सामन्यात विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर संधी दिली होती. पण तो फारसा प्रभावी ठरला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीबद्दल चर्चा होत आहेत. आज होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या सामन्यासाठी आता भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर दुसऱ्या खेळाडूला संधी देणार की शंकरवरील विश्वास कायम ठेवणार हे पहावे लागणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘हिटमॅन’ रोहित शर्माला एमएस धोनीचा तो खास विक्रम मागे टाकण्याची आज सुवर्णसंधी
–आज ३७ धावा करताच किंग कोहलीच्या नावावर होणार तो मोठा विश्वविक्रम