भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म सध्या फारसा चांगला नाही. चांगल्या सुरुवातीचे रूपांतर तो मोठ्या खेळीत करण्यात अपयशी ठरतोय. त्याचवेळी भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या खराब फॉर्मबाबत त्याला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रोहित शर्माने आपल्या फलंदाजीत फारसा बदल करू नये. यापूर्वी तो जसा खेळत असे तसेच त्याने आता खेळावे.
सुनील गावसकर हे नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. रोहितचे नेतृत्व आणि फलंदाजी याविषयी त्यांनी काही सल्ले दिले. रोहितने थेट गोलंदाजांवर हल्ला करण्यापेक्षा थोडा वेळ घेऊन नंतर आपले फटके खेळावेत, असे ते म्हणाले. त्यांनी आपले मत प्रदर्शित करताना म्हटले, “रोहित शर्मा याआधीही असाच खेळायचा आणि त्याला त्याच गोष्टीकडे परतण्याची गरज आहे. रोहितकडील फटक्यांची संख्या पाहता, तो सध्या जे काही करतोय ते करण्याची त्याला गरज नाही. गोलंदाजाने चेंडू सोडण्यापूर्वी ते पुढे येतोय. त्याने हे सर्व करू नये. पूर्वी तो ज्या पद्धतीने खेळायचा, त्याचा स्ट्राईक रेट जबरदस्त होता. त्याशिवाय त्याने इतर काहीही करू नये. गेल्या काही सामन्यांपासून तो वेगळे काहीतरी करण्याच्या नादात बाद होतोय.”
रोहित हा जगातील सर्वात यशस्वी टी20 क्रिकेटपटू आहे. आपल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत त्याने 3500 पेक्षा जास्त धावा आपल्या नावे केल्या आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये चार शतके झळकावलेला तो एकमेव फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त आयपीएलमध्ये त्याच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद पटकावलेय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया2022 स्पर्धेच्या यजमान शहराच्या लोगोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते अनावरण
INDvsAUS: हैद्राबादमध्ये तिकीटांसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचा लाठीचार्ज, जखमींचा आकडा…
बापरे! तब्बल २२ क्रिकेटपटूंच्या ऑटोग्राफला मिळाला होता केवळ एक रुपया