---Advertisement---

LSGचा माजी खेळाडू भडकला, मीडियावर जोरदार फटकारा! जाणून घ्या प्रकरण

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील 50वा सामना आज (22 मार्च) दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (DC vs LSG) संघात खेळला जाईल. दरम्यान दोन्ही संघ एकन्ना स्टेडियमवर आमने-सामने असतील. तत्पूर्वी लखनऊ सुपरजायंट्सचा माजी स्टार खेळाडू अमित मिश्रा (Amit Mishra) मीडियावर आपला राग गमावून बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला हा दिग्गज फिरकी गोलंदाज घरगुती हिंसाचाराशी त्याचे नाव जोडल्याबद्दल मीडिया रिपोर्ट्सवर प्रचंड संतापला आहे आणि त्याने मीडियाला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली आहे.

आयपीएलचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा 18व्या हंगामात कोणत्याही संघाचा भाग नाही. 2024च्या हंगामात लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळणारा अमित घरगुती हिंसाचाराच्या संदर्भात मीडिया रिपोर्ट्समध्ये चर्चेत होता, जिथे त्याच्या मॉडेल पत्नीने त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. अशा बातम्या दाखवल्याबद्दल अमित मिश्रा मीडियावर संतापला आहे आणि त्याने कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे.

अमित मिश्राच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर त्याने सर्व माध्यमांचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आणि खोट्या बातम्या दाखवल्याबद्दल आणि त्यांचे फोटो चुकीचे प्रकाशित केल्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. मिश्राने स्पष्ट केले आहे की या बातम्या पूर्णपणे मूर्खपणाच्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी क्रिकेटपटू अमित मिश्राच्या मॉडेल पत्नीने 1 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे आणि लग्नाच्या वेळी मिश्रा आणि त्याच्या कुटुंबाने 10 लाख रुपये रोख आणि कारची मागणी केल्याचा आरोपही तिने केला आहे.

अमित मिश्राने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट ‘X’ वर लिहिले, “मीडियामध्ये जे प्रसारित होत आहे त्यामुळे मी अत्यंत निराश झालो आहे. मी नेहमीच प्रेसचा आदर करतो, परंतु जरी बातम्या अचूक असल्या तरी, वापरलेला फोटो माझा आहे. जो पूर्णपणे खोटा आहे. असंबंधित कथांसाठी माझ्या प्रतिमेचा वापर त्वरित थांबवावा, अन्यथा मला कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडले जाईल.”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---