पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागची खूप प्रशंसा केली आहे. त्यांनी सेहवागला गेमचेंजर म्हटले आहे. लतीफ म्हणाले की, सेहवाग नेहमी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांसारख्या महान क्रिकेटपटूंच्या सानिध्यात राहिला आहे. पण, त्याची तेवढी प्रशंसा झाली नाही जेवढ्याचा तो हक्कदार होता. Former pakistani captain rashid latif called virender sehwag as gamechanger.
पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक फलंदाज लतीफ पुढे म्हणाले की, सेहवाग जर भारताऐवजी दुसऱ्या संघाकडून खेळला असता. तर, त्याच्या कसोटीत ८ हजार नाही तर १० हजार धावा झाल्या असत्या. हे सर्व लतीफ युट्यूबवरील एका व्हिडिओत पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिडा पत्रकार डॉ. नुमान नियाज यांच्यांशी बोलताना म्हणाले.
व्हिडिओच्या सुरुवातीला नियाज यांनी सेहवागची क्रिकेटच्या सर्व स्वरुपातील आकडेवारी सांगितली. सेहवाग हा शोएब अख्तरचा आवडता क्रिकेटपटू आहे. मात्र, खेळताना तो पळून जास्त धावा घेत नव्हता. यावर लतीफ म्हणाले की, “आपले अनेक क्रिकेटपटूही पळत जास्त धावा घेऊ शकत नाहीत. यामुळे आम्हाला वाईट वाटते. पण, सेहवागचे हात आणि डोळ्यांचे संतुलन चांगले होते. त्याची फलंदाजी शैलीही दमदार होती. त्याला बॅकफुट पंच, कट आणि पुल जबरदस्त खेळता येत होते.”
“सेहवागने एका कसोटीत ब्रेट लीच्या पहिल्या षटकातच २ चौकार मारले होते. त्याने मारलेले चौकार हे वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलप्रमाणे होते. सेहवाग आणि गेल दोघांनीही कसोटीत २-२ त्रिशतके केली आहेत. तरीही त्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हटले जाते.”
पुढे बोलताना लतीफ म्हणाले की, “असे खेळाडू खूप खतरनाक असतात. सेहवागने कसोटीत ८ हजारपेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. तो सचिन आणि द्रविड अशा क्रिकेटपटूंसोबत खेळला. पण जर तो दुसऱ्या देशाचा भाग असता, तर त्याने सहज १० हजार धावा केल्या असत्या.”
आयसीसीने असे खंडन केले आहे की, जे क्रिकेटपटू १० हजार धावा करतात तेच महान असतात. पण हे चुकीचे आहे. अरविंद डी सिल्वा, मार्टिन क्रो, जावेद मियांदाद यांसारख्या क्रिकेटपटूंनीही १० हजार धावा केल्या नाहीत. तरीही ते महान आहेत.
लतीफ पुढे बोलताना म्हणाले की, “सेहवाग खेळताना विरुद्ध संघावर वर्चस्व निर्माण करत होता. सलामीवीर फलंदाज हे थोडे घाबरलेले असतात. त्यांचे सर्व लक्ष खेळट्टीकडे असते. पण, सेहवाग असा खेळाडू नव्हता.”
“सेहवाग हा २००३ सालच्या विश्वचषकात शतक करणारा पहिला क्रिकेटपटू होता. विरोधी संघातील खेळाडू त्याला घाबरत असायचे. सर्वांना या गोष्टीची भीती वाटत असायची की, जर सेहवाग जास्त वेळ मैदानावर टिकला तर तो सामना संपवूनच मैदानावरून जाणार. खेळताना त्याचे संतुलन व्यवस्थित असायचे. त्याला पळून अधिक धावा घेता येत नव्हत्या. तरीही तो उत्कृष्ट होता,” असे लतीफ यांनी सांगितले.
ट्रेंडिंग घडामोडी-
जेव्हा जडेजाने महिला क्रिकेटपटूला भेटायला बोलावले होते स्विमिंगपुलवर, चॅटींग झाले होते व्हायरल
टीम इंडियाचे एकेवेळचे दोन असे शिलेदार, एक आहे आयएएस तर दुसरा आहे…
टोपीवरुन राजकारण तापले! शेन वाॅर्न म्हणतोय मला ‘असल्या’…