सध्या सर्वत्र आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेची चर्चा सुरू आहे. सोमवारी (१८ ऑक्टोबर) या स्पर्धेत पात्रता फेरीतील चौथा सामना श्रीलंका आणि नामबिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी श्रीलंका क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचे माजी कर्णधार बंदुला वर्णापुरा यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
बंदुला वर्णापुरा यांच्या जाण्याने श्रीलंका क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. दरम्यान सोमवारी (१८ ऑक्टोबर) त्यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी १९८२ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण केले होते. त्यांनी श्रीलंका संघासाठी पहिल्या चेंडूचा सामना केला होता. याच सामन्यात त्यांच्या नावे प्रथम फलंदाजी आणि प्रथम गोलंदाजी (दुसऱ्या डावात) करण्याच्या विक्रमाची नोंद झाली होती. ही मालिका झाल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिका दौरा करण्याचा निर्णय घेतला होता.
श्रीलंका क्रिकेटने देखील बंदुला वर्णापुरा यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे. श्रीलंका क्रिकेटचे प्रमुख शम्मी सिल्वा यांनी ट्विट करत म्हटले की, “मी श्रीलंका संघाचे पहिले कसोटी कर्णधार बंदुला वर्णापुरा यांच्या जाण्याने खूप दु:खी आहे. ते एक खूप चांगले क्रिकेटपटू, प्रशिक्षक, समालोचक आणि त्यापेक्षाही अधिक एक चांगले व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने क्रिकेट समुदायाचे मोठे नुकसान झाले आहे. मला खात्री आहे की त्यांचे नाव आणि कार्य आमच्या हृदयात कायम राहील.”
May he attain the supreme bliss of Nibbana 🙏 pic.twitter.com/j7ynZIOWCi
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 18, 2021
It’s Sad to hear the news of SL first test captain Bandula Warnapura’s demise after a brief illness. Thoughts are with his wife and children.. He coached me at Nalanda and was a steady influence in my growth as a cricketer and a person. May you attain Nibbana Sir !!! 🙏🏻 pic.twitter.com/muIfBO14cZ
— Mahela Jayawardena (@MahelaJay) October 18, 2021
https://twitter.com/chandi_17/status/1449977180834959361?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1449977180834959361%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-sri-lanka-first-test-captain-bandula-warnapura-dies-at-68-4854852.html
बंदुला वर्णापुरा यांनी ४ कसोटी आणि १२ वनडे सामन्यात श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर १९७५ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पदार्पण केले होते. त्यांनतर त्यांनी पुढील सामन्यात डेनिस लिली आणि जेफ थॉमसन यांच्या भेदक गोलंदाजीसमोर ३९ चेंडूंमध्ये ३१ धावांची खेळी केली होती. त्यांनी ४ कसोटी सामन्यात १२ च्या सरासरीने ९६ धावा केल्या होत्या. तर १२ वनडे सामन्यात १५ च्या सरासरीने १८० धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पैसाच सर्वकाही आहे, पैसा नसता तर आज मी पेट्रोल पंपवर काम करत असतो,’ पांड्याचे मोठे वक्तव्य
टी२० विश्वचषकातील ‘या’ विक्रमावर कोहलीची नजर, जयवर्धनेची ७ वर्षांची बादशाहत उध्वस्त करत बनेल नंबर १