---Advertisement---

एकेकाळी आरसीबीकडून खेळलेले ‘हे’ ७ खेळाडू आज आरसीबी विरुद्धच उतरलेत मैदानात

---Advertisement---

आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात युएई देशात होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज ११ पंजाब संघात झाला. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत किंग्ज ११ पंजाबला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते.

या सामन्यात एकेवेळी आरसीबीकडून खेळलेले तब्बल ४ खेळाडू आरबीसीविरुद्ध खेळताना दिसले. यातील सलामीवीर केएल राहुल व मयांक अगरवाल हे पंजाबकडून सलामीला आले होते. केएल राहुलने २०१३ ते २०१६ या काळात आरसीबीकडून १९ सामने खेळले होते. तर मयांक अगरवालने आरसीबीकडून १२ सामने खेळले आहेत.

२२ वर्षीय युवा स्फोटक फलंदाज सर्फराज खानही आरसीबीकडून २०१५ ते २०१८ या काळात तब्बल २५ सामने खेळला आहे. त्यालाही पंजाबने या सामन्यात संधी दिली होती. भारताकडून कसोटीत त्रिशतक केलेल्या करुण नायरनेही आरसीबीकडून २ सामने खेळले आहेत.

याचबरोबर पंजाबच्या डगआऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंमध्ये ख्रिस गेल, ख्रिस जॉर्डन व मनदीप सिंग यांनीही आरसीबीकडून आयपीएल सामने खेळले आहेत. २०११ ते २०१७ या काळात गेलने ९९, २०१५ ते २०१८ या काळात मनदीप सिंगने ४० तर ख्रिस जॉर्डनने ९ सामने खेळले होते. परंतू त्यांना गुरुवारच्या सामन्यात संधी मिळाली नाही.

याचाच अर्थ पंजाब संघाच्या खेळाडूंमध्ये तब्बल ७ शिलेदार हे आरसीबीचे माजी शिलेदार आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---