नाशिक विरुद्ध यजमान अहमदनगर, मुंबई उपनगर विरुद्ध सातारा अशा किशोरी (मुली) गटात, तर पुणे विरुद्ध लातूर, रायगड विरुद्ध उस्मानाबाद अशा किशोर (मुले) गटातील लढतीने “३१व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला” आज पासून प्रारंभ होईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने दि. २३ ते २५ जाने. या कालावधीत घेण्यात येणाऱ्या या कबड्डी स्पर्धेकरिता रेसिडेंसीयल हायस्कुलचा परिसर सज्ज झाला असून स्पर्धेची तयारी जोरदार सुरू आहे.
या स्पर्धेकरिता बनविण्यात आलेल्या ६ मातीच्या क्रीडांगणावर शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. प्रेक्षकांकरिता पाच ते सहा हजार क्षमतेची गॅलरी उभारण्यात आली आहे. सायंकाळच्या सत्रात देखील सामने खेळविण्यात येणार असल्यामुळे प्रखर विद्युतझोताची व्यवस्था करण्यात आली आहे. कबड्डी रसिकांना सामन्यातील चुरस अनुभवता यावी म्हणून ६ क्रीडांगणावर धावत्या विद्युत गुणफलकाची व्यवस्था करण्यांत आली आहे.
नितीन बरडे – जळगाव, दिनेश चव्हाण – सिंधुदुर्ग, चंद्रशेखर शहा – कोल्हापूर, सुजाता काळगावकर – मुंबई शहर (प्रशिक्षिका) हे किशोरी, तर शंकर बुडढे – लातूर, पंढरीनाथ घुगे – हिंगोली, तुकाराम शेळके – परभणी, प्रशांत भाबड – नाशिक (प्रशिक्षक) हे किशोर गट निवड समिती सदस्य म्हणून काम पहातील. स्पर्धा निरीक्षक म्हणून उस्मानाबादचे आप्पासाहेब हुबे, तर पंचप्रमुख म्हणून नाशिकचे सतीश सूर्यवंशी हे काम पहातील.
दि. २३ जाने. रोजी सायं. ठीक ४-३० वाजता प्रथम सामन्यांना सुरुवात होईल. त्यानंतर सायं. ६-३० वाजता पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेच्या उदघाटनाची औपचारिकता पूर्ण करण्यात येईल.
उल्हासनगर महापौर कबड्डी चषक स्पर्धेत मावळी मंडळ, जय बजरंग, शिवतेज संघाची आगेकूच
वाचा👉https://t.co/OQtYIXs9C1👈#म #मराठी #Kabaddi— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
…तर टीम इंडिया वाढवणार न्यूझीलंडचे टेन्शन, या दिग्गजाने व्यक्त केले मत
वाचा- 👉https://t.co/BJMqU2Wspd👈#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020