---Advertisement---

श्रीसंतच्या आरोपांना गौतम गंभीरचं प्रत्युत्तर; म्हणाला, ‘जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष…’

Gautam Gambhir And Sreesanth
---Advertisement---

लीजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात मैदानावर जोरदार वादावादी झाली. यानंतर श्रीशांतने एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, गौतम गंभीरने त्याच्याविरुद्ध अत्यंत वाईट शब्द वापरले आहेत आणि तो कोणत्याही खेळाडूचा आदर करत नाही. आता गौतम गंभीरनेही ट्विट करत अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

गौतम गंभीर (GautamGambhir) याने एस श्रीसंत (S Sreesanth) याच्या चेंडूवर षटकार मारला आणि त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाला. या घटनेबाबत एस श्रीसंतने धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणाला की, गौतम गंभीरने त्याच्याविरोधात जे शब्द वापरले आहेत ते मी सांगू शकत नाही. श्रीशांतच्या मते, गंभीर त्याच्या वरिष्ठ खेळाडूंचा अजिबात आदर करत नाही. श्रीसंतने व्हिडीओ शोअर केला आणि म्हणाला, “मिस्टर फायटरचे काय झाले याबद्दल मला गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. गंभीर नेहमीच आपल्या सहकारी खेळाडूंशी भांडत असतो. वीरू भाईसह कोणत्याही वरिष्ठ खेळाडूचा तो आदर करत नाही. आजही तेच झाले. कोणतेही कारण नसताना तो माझ्याविरुद्ध असे शब्द वापरत राहिला, जे खूप वाईट होते. आज नाही तर उद्या तुम्हाला कळेल की त्याने काय केले. क्रिकेटच्या मैदानावर त्याने वापरलेले शब्द मान्य नाहीत. माझे कुटुंब, माझे राज्य, प्रत्येकजण खूप अडचणीतून गेला आहे. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने मी ही लढाई लढली आहे. आता लोकांना माझा अपमान करायचा आहे. त्याने असे काहीतरी बोलले जे त्याने बोलायला नको होते आणि मी तुम्हाला त्याबद्दल नक्कीच सांगेन.”

https://twitter.com/GautamGambhir/status/1732641127193542902?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1732641127193542902%7Ctwgr%5Eccf1d1ab3cc59ca6a4f7e7f71af8276f15db7d26%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Fgautam-gambhir-cryptic-tweet-after-fight-with-sreesanth-in-legends-league-cricket-2023

आता गौतम गंभीरनेही श्रीसंतला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसून, तो ट्विट करत म्हणाला, “जेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष हवे असते तेव्हा फक्त हसायचं.” (Gautam Gambhir’s response to Sreesanth’s allegations Said When the whole world’s attention)

महत्वाच्या बातम्या

बीबीएल 2023मध्ये घोंगावलं Colin Munro नावाचं वादळ! नाबाद 99 धावा चोपत संघाला गाठून दिली ‘एवढी’ धावसंख्या
नाद करा पण हरमनप्रीतचा कुठं! सामना गमावला, पण नावावर केला विश्वविक्रम, बनली जगातली पहिली फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---