पुणे। जाएंट्स अ आणि घोरपडी तमिळ युनायटेड संघांनी पीडीएफए फुटबॉल लीगच्या सुपर एट विभागात सुपर सुरवात केली. एसएसपीएमएसच्या मैदानावर द्वितीय श्रेणीतील सपर ८ सामन्यांना सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात जाएंटस संगाने इंडिया सॉकरचा ३-१ असा पराभव केला. घोरपडी तमिळ युनायटेडने डेक्कन इलेव्हन सी संघाला १-० असे हरवले.
व्हिव्हियन भोसले याने १२व्या मिनिटाला गोल करून न्यू इंडिया सॉकर सँघाला झकास सुरवात करून दिली. मात्र, एवढ्यावरच त्यांना समाधान मानावे लागले. उत्तरार्धात प्रथम ४४व्या मिनिटासला रोहन खोतने जाएंटसला बरोबरी मिळवून दिली. त्यांतर ४६व्या मिनिटाला अंशुल शर्माने दुसरा, तर आदेश सोनकांबळेने ६१व्या मिनिटाला गोल केला.
दुसऱ्या सामन्यात सॅमसन पिल्ले याने अतिरिक्त वेळे ६४व्या मिनिटाला केलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर घोरपडी युनायटेडने डेक्कन इलेव्हन सी संघावर विजय मिळविला.
राहुल एफए आणि डायनामाईटस यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
अन्य सामन्यात विनायक अनमोल याने २८ आणि ५४व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या दोरावर सनी डेजने एनडीए युथ स्पोर्टस क्लबचा ३-० असा पराभव केला. संदिप खाटे याने अन्य एक गोल २१व्या मिनिटाला केला.
सप महाविद्यालयाच्या मैदानावरील सामन्यात सिटी एफसीने अमित जरेचे दोन आणि गॅरी रॉड्रिग्जच्या एकमेव गोलच्या जोरावर ब्लॅक हॉक्सचा ३-० असा पराभव केला.
निकाल-
एसएसपीएमस मैदानावर द्वितीय विभाग, सुपर-८:
जायंट्झ ‘ए’: 3 (अंशुल शर्मा 46वे, रोहन खोत 44वे, आदेश सोनकांबळे 60+1वे) वि.वि. न्यू इंडिया सॉकर: 1 (व्हिव्हियन भोसले 12वे)
राहुल एफए : 0 बरोबरी वि. डायनामाईट्स 0
घोरपडी तमिळ युनायटेड: 1 (सॅमसन पिल्ले 60+4वे) वि.वि. डेक्कन इलेव्हन ‘क’: 0
एसएसपीएमएस मैदान – रेलीगेशन प्ले ऑफ
सुखाई एफसी 1 (गणेश काळे 13वे) वि.वि. वानवडी एससी : 0
सनी डेज 3 (संदीप खाटे 21वे, विनायक अनमोल 28वे, 54वे) वि.वि. एनडीए युथ स्पोर्ट्स क्लब : 0
सप महाविद्यालय मैदान – थर्ड डिव्हिजन
गट जी : सिटी एफसी पुणे : 3 (अमित जरे 51वे, 55वे, गॅरी रॉड्रिग्स 60वे) वि.वि. ब्लॅक हॉक्स: 0
गट डी : लिजेंड्स एफए : 0 बरोबरी वि. इंद्रायणी एससी बी : 0
पूल-डी: लहान मुले बीटी एफसी पिंपरी चिंचवड – वॉकओव्हर
गट ई-नाझ एफए (पुढे चाल) वि. स्निग्मय एफसी ब
गट अ – परशुरामियन्स ‘ब’: 2 (संतोष थोपटे 9वे, अमन शेख 40वे, स्वयं गोल) वि.वि. नव महाराष्ट्र: 0
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डेक्कन इलेव्हन इव्हज, पीसीएच लायन्सचे अपराजित्व कायम; पीडीएफए फुटबॉल लीगमधील विजयी घोडदौड सुरूच
पुणेरी वॉरियर्सच्या विजयात निलिशा, राशीची हॅट्रिक
अशोका इलेव्हन, लिजेंड्स युनायटेडचा सहज विजय