पुणे : एमजेएम ग्लॅडिएटर्स, आरआर स्पार्टन्स, पीपी रॉयल्स, किअॅक किकर्स, तापडियाज थंडर्स, मालपाणी पँथर्स, दुबई एक्स्पर्ट्स डायनामोज, श्री माव्हरिक्स या संघांनी महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी फुटबॉल लीग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमधील फुटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू आहे.
डायनामोज संघाने गटातील अखेरच्या लढतीत किअॅक किकर्स संघावर १-०ने मात केली. विभोर सोनीने पाचव्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. डायनामोज संघाने अ गटातील पाच पैकी तीन लढती जिंकल्या. यात एक लढत गमावली, तर एक बरोबरीत सुटली. डायनामोज संघ १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर राहिला.यानंतर तपाडियाज थंडर्स संघाने एनपीएव्ही निन्जास संघावर २-० ने विजय मिळवला. यात थंडर्स संघाकडून हृषीकेश राठी (९ मि.) आणि सार्थक मुंदडा (१३ मि.) यांनी गोल केले.
यानंतर मालपाणी पँथर्स संघाने ग्लॅडिएटर्स संघावर रोमहर्षक लढतीत ३-२ असा विजय मिळवला. पँथर्स संघाकडून श्लोक झंवरने (१३, २२ मि,) दोन, तर प्रणन न्यातीने (१५ मि.) एक गोल केला, तर ग्लॅडिएटर्स संघाकडून स्मित झंवरने (४, ८ मि.) दोन गोल केले. यानंतर श्रावण राठीच्या हॅटट्रिकसह केलेल्या चार गोलच्या जोरावर पीपी रॉयल्स संघाने ट्रूव्हिव विकिंग्ज संघावर ५-०ने मात केली. श्रावणने ६, १०, १९, २१व्या मिनिटाला गोल केले, तर पाचवा गोल यश सिकचीने (१४ मि.) केला.अ गटात तपाडिया थंडर्स संघ ९ गुणांसह दुसरा, स्पार्ट्न्स संघ ९ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. दोन्ही संघांनी पाचपैकी तीन लढती जिंकल्या, तर दोन गमावल्या. ब गटात रॉयल्स संघ ५ सामन्यांत तीन लढती जिंकून दहा गुणांसह अव्वल क्रमांकावर राहिला. रॉयल्सने एक लढत गमावली, तर एक लढत बरोबरीत सोडवली. ग्लॅडिएटर्स संघ नऊ गुणांसह दुसऱ्या, तर श्री माव्हरिक संघ नऊ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. दोन्ही संघांनी पाचपैकी तीन लढती जिंकल्या, तर दोन लढती गमावल्या. (Gladiators, Spartans, Royals, Dynamos in quarterfinals)
निकाल – मालपाणी पँथर्स – ३ (श्लोक झंवर १३, २२ मि., प्रणव न्याती १५ मि.) वि. वि. ग्लॅडिएटर्स – २ (स्मित झंवर ४, ८ मि.)
तापडियाज थंडर्स – २ (हृषीकेश राठी ९ मि., सार्थक मुंदडा १३ मि.) वि. वि. निन्जास -०
पीपी रॉयल्स – ५ (श्रावण राठी ६, १०, १९, २१ मि.,यश सिकची १४ मि.) वि. वि. विकिंग्ज –
०स्पार्टन्स – १ (परम जखोटिया २२ मि.) वि. वि. श्री गणेश वॉरिअर्स – ०
श्री माव्हरिक्स – १ (क्षीतिज लोहिया २० मि.) वि. वि. सीएनजी राठी रॉयल्स – ०
दुबई एक्स्पर्ट डायनामोज – १ (विभोर सोनी ५ मि.) वि. वि. किअॅक किकर्स -०
अशा रंगतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती – ग्लॅडिएटर्स वि. स्पार्टन्सरॉयल्स वि. किकर्सतपाडियाज थंडर्स वि. मालपाणी पँथर्सडायनामोज वि. श्री माव्हरिक्स
महत्वाच्या बातम्या –
खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर प्रथमेश शेरला, संदेश बजाज, अर्पित गजभिजे, अर्जुन कौलगुड आघाडीवर
22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेस रविवारी सुरुवात