---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंडसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ वेगवान गोलंदाज संघात परतणार!

Team England
---Advertisement---

टीम इंडियाला (team india) 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लड दौऱ्यावर जायचे आहे. त्यासाठी टीम इंडिया आज म्हणजेच 6 जून रोजी इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. पहिला सामना हेडिंग्ले येथील लीड्स मैदानावर होणार आहे. पहिल्या सामन्याआधी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये इंग्लंड संघासाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. संघामध्ये एक तुफानी गोलंदाज मोठ्या काळानंतर सामील होणार आहे. तसेच ही गोष्ट टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकते.

इंग्लंड संघाचे मुख्य निवडकर्ते ल्यूक राइटने आर्चर विषयी म्हटले आहे की, जोफ्रा आर्चर (jofra Archer) भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसू शकतो. त्याच्या संघात परतण्याने इंग्लडची गोलंदाजी अधिक मजबूत होऊ शकते.

वेगवान गोलंदाज गस एटकिंसन सुद्धा दुखापतीच्या कारणाने पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. जर आर्चर आणि एटकिंसन यांची दुसऱ्या सामन्यात पुनरागमन झाले तर टीम इंडियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जोफ्रा आर्चरने इंग्लंडसाठी शेवटचा कसोटी सामना भारत विरुद्ध 4 वर्षांपूर्वी खेळला होता. त्यानंतरच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे स्थान निर्माण केले. इंडिया ए विरुद्ध त्याला 2 अनऑफीशियल सामने खेळायचे होते, पण दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. आयपीएल 2025 दरम्यान राजस्थान कडून खेळताना अंगठ्याला दुखापत झाली होती.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---