---Advertisement---

GT vs RR : जिंकण्यासाठी राजस्थान समोर 218 धावांचे आव्हान

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 23 वा सामना आज (9 एप्रिल) रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवला जात आहे. गुजरात टायटन्स हा संघ शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली तसेच राजस्थान रॉयल्स हा संघ संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरले आहेत. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 6 खेळाडू गमावून 217 धावांचा टप्पा गाठला. व आता राजस्थानला जिंकण्यासाठी 218 धावांचा टप्पा गाठायचा आहे.

गुजरात साठी सर्वाधिक धावा साई सुदर्शनने केल्या. त्याने 53 चेंडूत 82 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 8 चौकार व 3 षटकार झळकावले. कर्णधार शुबमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही. गिलने केवळ 3 चेंडूत 2 धावा केल्या.

राजस्थानसाठी जोफ्रा आर्चरने 4 षटकांत 30 धावा देत 1 विकेट घेतली. याचबरोबर तुषार देशपांडे याने 4 षटकांत 53 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. आता राजस्थान हे आव्हान पूर्ण करू शकेल का नाही हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---