मुंबई। भारताचे क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग एकमेकांचे पूर्वीपासून चांगले मित्र आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते एकमेकांची चेष्टा करत असतात.
असेच काल युवराज सिंगच्या घरातील लाईट गेल्याने युवराजची ट्विटरवर हरभजनने चेष्टा केली आहे. लाईट गेल्याने त्रासलेल्या युवराजने ट्विट केले की “एक तास झाले आहेत बांद्रामधील लाईट गेली आहे. ती आम्हाला परत मिळेल का, प्लीज?”
Lights Out in Bandra for over an hour now … can we get it back please ?!?! 😐
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 4, 2018
यावर हरभजनने युवराजला मजेशीर उत्तर दिले. हरभजनने युवराजला ट्विट केले की “बादशहा वीजबील वेळेवर भरत जा.”
Badshah bill time par diya karo 😜😜😂😂 https://t.co/qHcWnktKtU
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 4, 2018
हे दोघे संधी मिळेल तेव्हा सोशल मिडीयावर एकमेकांचे मैत्रीच्या भावनेने पाय खेचत असतात. सध्या हे दोघेही भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्येही त्यांना खास काही करता आलेले नाही.