यंदाच्या आयपीएल हंगामाचा (IPL Season 18) अर्धा प्रवास संपला आहे. या हंगामात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. हंगामातील अर्ध्या सामन्यांनंतर, गुजरात टायटन्स (Gujrat Titans) गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांच्या आधारे, गुजरात टायटन्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा निश्चित दावेदार मानले जात आहे. शुबमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 6 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. याचे श्रेय संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरालाही (Ashish Nehra) जाते.
आता माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh) त्याच्या यूट्यूब चॅनलवर गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराबद्दल वक्तव्य केलं आहे. भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये नेहराच्या समावेशाबद्दल बोलताना हरभजन म्हणाला, “मला वाटतं की सध्या भारतीय संघासाठी त्यांच्यापेक्षा चांगला प्रशिक्षक नाही. ते खूप चांगले प्रशिक्षक आहेत. बीसीसीआयने त्यांना विचारलं पाहिजे की त्यांना भारतीय संघासोबत काम करायचं आहे की नाही. मला वाटत नाही की ते यासाठी सहमत होतील कारण ते जास्त वेळ देऊ शकणार नाहीत. पण त्यांच्यापेक्षा चांगला पर्याय नाही.”
हरभजन सिंग पुढे म्हणाला, “आशिष नेहरा संघात सामील झाला त्या दिवसापासून त्याने या संघात जीव ओतला आहे. दरवर्षी ही संघ तयारीनिशी येतो. लोक म्हणतात की डावखुरा फिरकी गोलंदाज डावखुरा फलंदाजांना गोलंदाजी करू शकत नाही किंवा ऑफ-स्पिनर उजव्या हाताच्या फलंदाजांना गोलंदाजी करू शकत नाही. पण आशिष नेहराच्या गोलंदाजांनी हे सर्व केले आहे. ही मानसिकतेची बाब आहे आणि आशिष नेहरा हे सर्व त्याच्यासोबत घेऊन येतो.”
KEM chooo Gujrat . Nehra ji mubarak ho. Team playing like champions . Well played Gill sahb @ShubmanGill and whole team. Specially Sai Sudharshan and Sai Kishore ♠️♠️. Great going 🧿🏏 @IPL
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 21, 2025